साडेतीन हजारांची लाच घेताना ग्रामसेवकास अटक

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 डिसेंबर 2018

सावली (जि. चंद्रपूर) : ग्रामपंचायत भवन बांधकामाचे देयक मंजूर करण्यासाठी तीन हजार 500 रुपयांची लाच घेताना ग्रामविकास अधिकाऱ्यास रंगेहात अटक करण्यात आली. ही कारवाई मंगळवारी (ता. 4) तालुक्‍यातील व्याहाड बु. येथे करण्यात आली. संदीप सब्बनवार असे लाच घेणाऱ्या ग्रामविकास अधिकाऱ्याचे नाव आहे.

तालुक्‍यातील व्याहाड बु. येथे जनसुविधा योजनेतून ग्रामपंचायत भवन मंजूर आहे. या बांधकामाचे कंत्राट अंकुश वरगंटीवार यांना मिळाले. मात्र, सर्व अधिकारासह हे काम वरगंटीवार यांनी तक्रारदार यांच्याकडे सोपविले. तक्रारदाराने भवनाचे बांधकाम सुरू केले. दिवाळीपूर्वी 3 लाख 84 हजार रुपयांचे देयक मंजुरीसाठी सादर केले. त्यानुसार ग्रामपंचायत प्रशासनाने वरगंटीवार यांच्या नावाने देयकाचा धनादेश जारी केला.
मागील आठवड्यात ग्रामविकास अधिकारी सब्बनवार यांनी तक्रारदाराला उर्वरित बांधकामाचे देयक मंजूर करण्यासाठी चार हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. तक्रारदाराने याबाबतची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. पंचासमक्ष सब्बनवार याने लाच स्वीकारण्याची तयारी दर्शविली. त्यानुसार आज सापळा रचण्यात आला. 3 हजार 500 रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक करण्यात आली.
ही कारवाई पोलिस उपअधीक्षक डी. एम. घुगे यांच्या मार्गदर्शनात पुरुषोत्तम चौबे, महेश मांढरे, सुभाष गोहोकार, अजय बागेसर, रविकुमार ढेंगळे, राहुल ठाकरे यांच्या पथकाने केली.

Web Title: gramsevak arrested