ग्रामसेवक नैकाने यांनी सात लाखाची केली अफरातफर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 मे 2018

अनुदान लाभार्थ्यांना न देता ग्रामसेवक वाय एस नैकाने यांनी  सरपंच यांची खोटी स्वाक्षरी करुन जय दुर्गा बिल्डींग च्या नावाने १३ एप्रिलला २ लाख ८० हजार रुपये व  ४ मे ला ४ लाख ४५ हजार रुपये धनादेश क्रमांक ५८७९ व दुसरा धनादेश क्रमांक ५८८० याव्दारे जय दुर्गा बिल्डींगच्या नावाने दिल्याचे बँकेने दिलेल्या खाते अहवालात दिल्याने हे प्रकरण उजेडात आले.

गोरेगाव (गोंदिया) - येथील पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या झांजियाचे ग्रामसेवक वाय एस नैकाने यांनी नरेगाच्या व्यक्तीगत शौचालय बांधकाम कुशल काम अनुदानातील 7 लाख २५ हजार रुपयांची अफरातफर केल्याची तक्रार सरपंच उषा दिहारी यांनी ता. १० मे गुरुवारी गटविकास अधिकारी दिनेश हरिणखेडे यांना केली.

ग्रामपंचायत झांजियाला नरेगातून शौचालय बांधकाम करण्यासाठी गरजु लाभार्थ्यांच्या नावाने प्रत्येकी 9 हजार ८०० रुपये महाराष्ट्र बँक शाखा गोरेगावच्या नरेगाच्या खात्यावर 7 लाख २५ हजार रुपये पंचायत समिती मार्फत जमा करण्यात आले होते. ते अनुदान लाभार्थ्यांना न देता ग्रामसेवक वाय एस नैकाने यांनी  सरपंच यांची खोटी स्वाक्षरी करुन जय दुर्गा बिल्डींग च्या नावाने १३ एप्रिलला २ लाख ८० हजार रुपये व  ४ मे ला ४ लाख ४५ हजार रुपये धनादेश क्रमांक ५८७९ व दुसरा धनादेश क्रमांक ५८८० याव्दारे जय दुर्गा बिल्डींगच्या नावाने दिल्याचे बँकेने दिलेल्या खाते अहवालात दिल्याने हे प्रकरण उजेडात आले.

या प्रकरणाची तक्रार सरपंच उषा दिहारी यांनी गटविकास अधिकारी दिनेश हरिणखेडे यांना केली असता हे प्रकरण गंभीर आहे. निलंबीत ग्रामसेवक वाय एस नैकाने यांना देता येत नाही. दुसरा ग्रामसेवक बघेले यांना प्रभारी ग्रामसेवक म्हणुन दिला आहे त्याच्या नावानी बँकेत खाते काढण्यात आले नाही व निलंबीत ग्रामसेवक वाय एस नैकाने यांनी ग्रामपंचायतचे रेकॉर्ड जमा केले नाही. यामुळेच हे प्रकरण घडले असावे. वैयक्तिक लाभाची रक्कम इतर कामाकरीता वळते करता येत नाही, हे अफरातफरीचा प्रकरण आहे. यामुळे गटविकास अधिकारी यांच्या नावाने तक्रार टाकल्यास पोलिसात तक्रार करतो, असी सुचना दिल्याने सरपंच उषा दिहारी यांनी गटविकास अधिकारी दिनेश हरिणखेडे यांना १० मे ला तक्रार केली. 

जय दुर्गा बिल्डींग ही संस्था कोणाची आहे, सात लाख २५ हजार रुपये कोणत्या कामाचे दिले या प्रकरणाची चौकशी पोलिसांनी केल्यास अनेकजण या प्रकरणात येतील, असी चर्चा झांजियावासी करीत आहेत. 

यशवंत पंचायत समिती पुरस्कार प्राप्त पंचायत समिती अंतर्गत असे अफरातफरीचे प्रकरण होत आहेत. असे अनेक प्रकरण होऊ शकतात. पण ते प्रकरण उजेडात आले नाहीत. एकटा ग्रामसेवक असी अफरातफर करु शकत नाही. यात मोठे मासे असल्याची चर्चा तालुक्यात होत आहे. या संपुर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात यावी. पिडीत महीला आदिवासी सरपंच उषा दिहारी यांना न्याय देण्यात यावा. अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य सुरेश साठवणे, संजय कटरे व गावकऱ्यांनी केली आहे.

'वाय एस नैकाने ग्रामसेवक यांना निलंबीत केले असुन त्यांनी दुसरा प्रभारी ग्रामसेवक बघेले याला पुर्ण रेकॉर्ड दिले नसल्याने असी अफरातफर झाली असावी. मी सरपंच उषा दिहारी यांनी दिलेेल्या तक्रारीनुसार पोलिसात तक्रार दाखल करतो, लवकरच या प्रकरणाची खरी माहिती पुढे येणार आहे.' - गटविकास अधिकारी दिनेश हरिणखेडे पंचायत समिती गोरेगाव

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Gramsevak Nakane made 7 lakh of fraud