आजी, माजी पशुसंवर्धन अधिकाऱ्यांची कारागृहात रवानगी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 सप्टेंबर 2019

अमरावती : समन्वयित कृषी विकास प्रकल्प (केम) मधील सहा कोटींच्या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी निवृत्त पशुसंवर्धन अधिकाऱ्यासह एक विद्यमान अधिकारी अशा दोघांनाही जिल्हा न्यायालयाने सोमवारी (ता. 16) न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यामुळे त्यांची रवानगी मध्यवर्ती कारागृहात झाली, असे पोलिस निरीक्षक आसाराम चोरमले यांनी सांगितले.

आर्थिक गुन्हेशाखेने शनिवारी (ता. 14) डॉ. विवेक नारायण भारदे (वय 57 शेवगाव, अहमदनगर) व यशवंत ज्ञानोबा वाघमारे (वय 43 रा. पिंपळेतिलक, पुणे) या दोघांना अटक केली होती. रविवारी (ता. 15) तपास अधिकाऱ्यांनी त्यांना विशेष न्यायालयासमोर हजर केल्यावर एक दिवसाची पोलिस कोठडी मिळाली. कोठडीची मुदत संपल्याने त्यांना सोमवारी (ता. 16) पुन्हा न्यायालयासमोर हजर केले.
भारदे हे निवृत्त झाले असून, वाघमारे हे पदावर कायम आहेत. या दोघांच्या पत्नींनी पुणे येथे सोल्यास कंपनीची स्थापना केली आहे. मात्र कंपनीची नोंदणी व्हायची होती. असे असताना गणेश चौधरीने पदाचा दुरुपयोग करून, सोल्यास कंपनीला 1 कोटी 34 लाखांचा कंत्राट दिला होता. त्यापैकी कंपनीला केवळ 84 लाख रुपयेच मिळाले होते. उर्वरित रक्कम कंपनीला घेणे बाकी होती, असे पोलिस कोठडीत चौकशीदरम्यान डॉ. भारदे व वाघमारे या दोघांनी सांगितले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Grandmother, ex-Animal Husbandry Officer`s sent in jail