आजोबाने डागाळले स्वतःच्याच नात्याला, अन्‌ केले असे कृत्य... 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 फेब्रुवारी 2020

गोंदिया जिल्ह्यातील फुलचूर गावात हा आजोबा आपल्या कुटुंबासोबत राहतो. एक दिवस घरची सर्व मंडळी नेहमीप्रमाणे कामासाठी घराबाहेर गेली होती. घरी केवळ आजोबा आणि त्याची लहान नात दोघेच होते.

गोंदिया : शेंगा खायला नेण्याच्या बहाण्याने एका आजोबाने स्वतःच्या नातीसह शेजारील अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. आपले नाते काय आणि वय काय याची पूर्णपणे जबाबदारी विसरून माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना जिल्ह्यातील फुलचूर गावात घडली. 

शेंगा खाऊ घालण्याचा केला बहाणा 

गोंदिया जिल्ह्यातील फुलचूर गावात हा आजोबा आपल्या कुटुंबासोबत राहतो. एक दिवस घरची सर्व मंडळी नेहमीप्रमाणे कामासाठी घराबाहेर गेली होती. घरी केवळ आजोबा आणि त्याची लहान नात दोघेच होते. घरातील लहान मुलांकडे लक्ष देणे, त्यांची देखरेख करणे, त्यांच्यासोबत खेळणे हे खास करून आजी-आजोबांचे काम असते. मात्र, हा आजोबा ही सर्व जबाबदारी विसरला. घरी कोणीही मोठे नसल्याचे पाहून त्याच्या डोक्‍यात सैतान शिरला. चला, आपण शेतात जाऊन शेंगा खाऊ, असा बहाणा करून स्वतःची नात आणि शेजारी राहणाऱ्या दुसऱ्या एका छोट्या मुलीला सोबत घेतले. त्यानंतर ते सर्व शेतात गेले. तेथे आजोबाने दोन्ही लहान मुलींवर अत्याचार केला.

अवश्‍य वाचा- धक्कादायक... शिक्षकाकडून मुलींचे लैंगिक शोषण 

याबाबत तुम्ही कोणालाही सांगू नका. मी तुम्हाला खाऊसाठी दहा रुपये देईन, असे आमीषही दिले. या लहानशा अजाणत्या मुली बिचाऱ्या काय बोलणार. त्या भीतीपोटी गुपचूप राहिल्या. मात्र, त्या कृत्यामुळे त्यांच्या नाजूक भागात वेदना होत होत्या. त्या वेदना मुलींना सहन करता आल्या नाही. त्यांनी याबाबत आईला सांगितले. आईने मुलींकडून सर्व माहिती घेतली असता तीच्या पायाखालची वाळूच सरकली. ज्याच्या भरवश्‍यावर मुलीला सोडून गेली होती, त्यानेच आपल्या नातीचे जीवन उद्‌ध्वस्त केले होते. ती गाराने लाल झाली. मुलींवर झालेला अत्याचार ती सहन करू शकली नाही. ती तडक उठून पोलिस ठाण्यात गेली आणि आपल्या हैवान सासऱ्याने केलेल्या कृत्याची तक्रार नोंदविली. पोलिसांनी आरोपी आजोबाविरुद्ध बाललैंगिक अत्याचार आणि बलात्काराचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Grandpa raped his own granddaughter...