ग्रामसचिवांची वेतनवाढ रोखली

file photo
file photo

नागपूर :  चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीतून एलईडी लाइटची खरेदी करताना ग्रामपंचायतीचे सरपंच व सचिवांनी गैरव्यवहार केल्याचे उघडकीस आले. 50 रुपयांचे किंमत असलेला लाइट चार ते पाच पट अधिक दराने खरेदी करण्यात आला. या प्रकाराची उच्चस्तरीय चौकशी सुरू असून, पहिल्या टप्प्यात ग्रा. पं.च्या सचिवांकडून रक्कम वसुली करण्याचे आदेश सीईओंनी काढले. तसेच दोन सचिवांची वेतनवाढही रोखली. या घोटाळ्यात सहभागी इतर सचिव व सरपंचाकडूनही वसुली करण्यात येणार असल्याचे बोलले जाते.
जिल्हा परिषदेच्या चौकशी समितीने 75 सरपंच व सचिवांवर घोटाळ्याचा व 76 जणांवर अनियमिततेचा ठपका ठेवला. तत्कालीन सीईओ कादंबरी बलकवडे यांनी तत्कालीन पंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले होते. त्यांनी संथगतीने चौकशी केली. त्यानंतर राजेंद्र भुयार यांनी चौकशीला गती दिली, हे विशेष. याप्रकरणी 318 पेक्षा अधिक ग्रामसचिव आणि सरपंचांना नोटीस बजावण्यात आली. त्यांची चौकशी पूर्ण असून, त्यांच्यावर दोषही सिद्ध झाला. या दोषींवर शिक्षा निश्‍चित करण्यासाठी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली. यात वित्त व लेखा अधिकारी, डेप्युटी सीईओ पंचायत व बांधकाम विभागाचे इलेक्‍ट्रिशियन इंजिनिअर यांचा समावेश आहे. या समितीने आपला अहवाल सीईओ संजय यादव यांना दिला. सीईओ यादव यांनी प्रत्येक दोषीवर स्वतंत्ररीत्या कारवाई करण्याचा प्रस्ताव देण्याचे निर्देश समितीला दिले.
त्यानुसार समितीने पहिल्या टप्प्यात या प्रकरणातील दोषी चार ग्राम सचिवांकडून या गैरव्यवहारातील हजाराहून अधिकची वसुली करण्याचे निर्देश दिले. सोबतच यातील दोन जणांची वेतनवाढही रोखली. समिती प्रकरणातील इतर दोषींच्या शिक्षेबाबतची पडताळणी करीत आहेत. लवकरच या महाघोटाळ्यातील दोषी सरपंच व सचिवांकडून एलईडी लाइट खरेदीतील फरकाची रक्कम वसूल केली जाणार आहे. आणखी काही सचिवांवर वेतनवाढ रोखण्याची कारवाई होण्याची शक्‍यता आहे.
ऑडिटमुळे फुटले बिंग!
ग्रामपंचायतीला हा निधी विकासकामांवर खर्च करायचा होता. परंतु, ग्रामपंचायतीने आवश्‍यक साहित्य खरेदी केले. सीएसआरपेक्षा अधिक दराने खरेदी करू नये, असे स्पष्ट आदेश असतानाही एलईडी लाइटवर ही रक्कम खर्च केली. हिंगणा, नागपूर ग्रामीण, नरखेड आणि काटोल तालुक्‍यातील ग्रामपंचायतींनी खरेदीच्या मर्यादा ओलांडल्यात. अखेर ही बाब जि. प.च्या ऑडिटमध्ये लक्षात आल्याने घोटाळ्याचे बिंग फुटले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com