आर्वी न्यायालयात आढळला मसन्या ऊद; वनविभागाच्या मदतीने पकडून सोडले जंगलात

दशरथ जाधव
Wednesday, 4 November 2020

भर दुपारी न्यायालयाच्या कर्मचाऱ्यांसह येथे आलेल्या नागरिकांना झाडावर अनोळखी प्राणी आढळला. तेथील कर्मचारी विशाल बाळसराफ यांनी आर्वी येथील प्राणिमित्र मनीष ठाकरे यांच्याशी संपर्क साधला.

आर्वी (जि. वर्धा) :  येथील न्यायालयात असलेल्या झाडावर मसन्या ऊद हा दूर्मिळ प्राणी लपून असल्याची माहिती प्राणीमित्रांना देण्यात आली. माहिती मिळताच प्राणीमित्रांनी घटनास्थळ गाठून पाहणी करीत त्याला ताब्यात घेतले. याची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली. त्यांनी या प्राण्याचा पंचनामा करून त्याला सारंगपुरी तलावाच्या परिसरात मुक्‍त केले.

क्लिक करा - ट्रेनमध्ये भुकेने व्याकुळ झाले होते चार महिन्याचे बाळ; जवळचे दूधही होते खराब; अखेर आरपीएफने दाखवली तत्परता 

भर दुपारी न्यायालयाच्या कर्मचाऱ्यांसह येथे आलेल्या नागरिकांना झाडावर अनोळखी प्राणी आढळला. तेथील कर्मचारी विशाल बाळसराफ यांनी आर्वी येथील प्राणिमित्र मनीष ठाकरे यांच्याशी संपर्क साधला.

माहिती मिळताच गरुडझेप वन्यजीव संरक्षण संस्थेचे प्राणीमित्र सहकाऱ्यांसह गौतम पोहणे, संतोष पडोळे, चेतन कहारे यांच्यासह घटनास्थळ गाठले व झाडाची पाहणी केली असता तिथे त्यांना झाडावर असलेला प्राणी दुर्मिळ मसन्या ऊद आहे असे त्यांनी उपस्थितांना सांगितले. 

त्यानंतर प्राणीमित्रांनी प्रयत्नानंतर त्याला पडकडून लगेच वनपरिक्षेत्र कार्यालय गाठून रितसर पंचनामा करण्यात आला. त्याला सारंगपुरी वन परिक्षेत्रात मुक्त करण्यात आले. त्यावेळी प्राणीमित्र रूपेश कैलाखे, तुषार साबळे, साहिल ठाकरे, अशुतोष जयदे तसेच वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी एन.एस जाधव, तसेच वनरक्षक भालेराव मून, मेश्राम, निघोट उपस्थित होते.

हेही वाचा - Success Story: तरुणीने फुलवला मशरूमचा मळा; कृषी शाखेच्या विद्यार्थिनीचा नाविन्यपूर्ण उपक्रम 

मसन्या उदला कांडेचोर, काळमांजर असे सुद्धा म्हणतात. हा एक सस्तन प्राणी आहे. मसन्या ऊद हा प्राणी मांसाहारी आणि निशाचर आहे. त्याच्या आंगावर काळे जाड केस असतात. त्याच्या शरीरा इतकीच त्याची शेपटीसुद्धा लांब असते हा प्राणी फळे, मास किडे खातो तसेच दिवसा हा प्राणी झाडाच्या फांदीला किंवा ढोलीत झोपतो. रात्री भक्ष्याच्या शोधात बाहेर पडतो, अशी माहिती वन्यजीव अभ्यासकांनी दिली.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Grave digger found in court of Arvi