esakal | सेव्ह मेरिट सेव्ह नेशन महारॅलीला उदंड प्रतिसाद
sakal

बोलून बातमी शोधा

नागपूर : सेव्ह मेरिट सेव्ह नेशन महारॅलीला महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली. हजारो आंदोलकांचे नेतृत्व करताना महिला आंदोलक.

सेव्ह मेरिट सेव्ह नेशन महारॅलीला उदंड प्रतिसाद

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : राज्यात आरक्षण 74 टक्‍क्‍यांपर्यंत पोहचले आहे. त्यामुळे गुणवंत विद्यार्थ्यांवर अन्याय होत असून नोकऱ्यांमध्येही खुल्या प्रवर्गाच्या जागा घटल्या आहेत. राज्यात 35 टक्‍के असलेल्या खुल्या प्रवर्गातील गुणवंतांना न्याय मिळावा या मागणीसाठी पुकारण्यात आलेल्या सेव्ह मेरिट सेव्ह नेशनच्या महारॅलीला विदर्भतील हजारो नागरिकांनी प्रतिसाद दिला.
विशेष म्हणजे या महारॅलीत गुजराती, राजपूत, ख्रिश्‍चन, पंजाबी आणि मुस्लिम समाजातील 110 संघटनांचे हजारो प्रतिनिधींनी सहभागी झाले. धंतोली येथील यशवंत स्टेडियम येथून प्रारंभ झालेल्या महारॅलीचा कस्तुरचंद पार्क येथे समारोप झाला. त्यानंतर डॉ. अनिल लद्धड, डॉ. संजय देशपांडे, डॉ. अनुप मरार यांच्यासह सेव्ह मेरीट सेव्ह नेशनच्या सर्व समन्वयकांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलेली 50 टक्के आरक्षणाची मर्यादा पाळण्यात यावी, ही प्रमुख मागणी सेव्ह मेरिट सेव्ह नेशनने केली आहे. महाराष्ट्रभर सेव्ह मेरिट सेव्ह नेशनद्वारे आंदोलन करण्यात येत असून त्याला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. एसएमएसएनच्या शिष्टमंडळासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच चर्चा करत 19 मागण्या मान्य केल्या होत्या. मात्र, त्या संदर्भातील जीआर अद्याप निघालेले नाहीत. शिवाय आरक्षणाला 74 टक्‍क्‍यांची मर्यादा असावी यावरही तोडगा निघालेला नसल्याने खुल्या प्रवर्गातील लोकांची चिंता वाढते आहे.

loading image
go to top