‘ग्रीन सिटी’ला प्रदूषणाचा विळखा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 मे 2018

नागपूर - ग्रीन बस व सौरऊर्जेचा वापर वाढवून प्रदूषणावर मात करण्याचा प्रयत्नांत असलेले नागपूर शहर जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रदूषित शहरांच्या यादीत झळकल्याने शहरवासींच्याही भुवया उंचावल्या. जागतिक आरोग्य संघटनेने शहरातील धूलिकणांत सातत्याने वाढ होत असल्याचा निष्कर्ष नोंदविला असून, पर्यावरणप्रेमींकडून चिंता व्यक्त केली जात आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांची यादी जाहीर केली. वायूप्रदूषणासंदर्भात ‘पीएम’ २.५ हे मानक ‘पीएम’ १० पेक्षा जास्त घातक मानण्यात येतात. २०१३ ते २०१६ या काळात शहरात पीएम २.५ चे प्रमाण सातत्याने वाढत आहे.  २०१३ मध्ये नागपुरातील पीएम २.५चे प्रमाण ३३ मायक्रोग्रॅम प्रतिक्‍युबिक मीटर इतके होते.

२०१६ मध्ये हा आलेख वाढून ८४ मायक्रोग्रॅम प्रतिक्‍युबिक मीटरवर पोहोचला. पीएम  २.५ च्या प्रमाणानुसार नागपूर देशातील प्रदूषित शहरांमध्ये १६ व्या क्रमांकावर आहे. जागतिक आरोग्य संघटनेची निर्धारित पातळी १० मायक्रोग्रॅम प्रतिक्‍युबिक मीटर इतकी आहे. भारतात ही पातळी ४० मायक्रोग्रॅम प्रतिक्‍युबिक मीटर इतकी आहे. या पातळीहून नागपुरात हे प्रमाण फार जास्त आहे.

‘पीएम १०’चे प्रमाणदेखील वाढीस
पीएम १० प्रमाणानुसार नागपूरचा क्रमांक देशात २५ वा आहे. २०१३ मध्ये ६१ मायक्रोग्रॅम प्रतिक्‍युबिक मीटर, २०१४ मध्ये ६३ मायक्रोग्रॅम प्रतिक्‍युबिक मीटर, तर २०१६ मध्ये ८६ मायक्रोग्रॅम प्रतिक्‍युबिक मीटरवर पोहोचले. त्यामुळे पीएम १० चे प्रमाण सातत्याने वाढत असल्याचे दिसून येत आहे.

Web Title: green city air pollution