हिंगणा होणार ग्रीन सिटी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 11 ऑगस्ट 2019

हिंगणा (जि. नागपूर) : नगरपंचायत प्रशासनाने शहर हिरवेगार करण्यासाठी एक हजार वृक्षलागवड करण्याची मोहीम सुरू केली आहे. 15 ऑगस्टपर्यंत ही मोहीम पूर्ण करण्यात येणार आहे. हिंगणा शहराला ग्रीन सिटी करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला आहे.हिंगणा शहराला पुरातन वारसा आहे. शहरात वेणा व दुर्गा नदीचा पवित्र असा संगम आहे. पर्यटनाच्या दृष्टीनेही हिंगणा शहर शहर महत्त्वपूर्ण असल्याने वेणा नदीच्या काठावर आमदार समीर मेघे यांच्या प्रयत्नाने 9 कोटींचा निधी मिळाल्याने पर्यटन विभागाचे सौंदयीकरणाचे काम सुरू आहे.

हिंगणा (जि. नागपूर) : नगरपंचायत प्रशासनाने शहर हिरवेगार करण्यासाठी एक हजार वृक्षलागवड करण्याची मोहीम सुरू केली आहे. 15 ऑगस्टपर्यंत ही मोहीम पूर्ण करण्यात येणार आहे. हिंगणा शहराला ग्रीन सिटी करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला आहे.हिंगणा शहराला पुरातन वारसा आहे. शहरात वेणा व दुर्गा नदीचा पवित्र असा संगम आहे. पर्यटनाच्या दृष्टीनेही हिंगणा शहर शहर महत्त्वपूर्ण असल्याने वेणा नदीच्या काठावर आमदार समीर मेघे यांच्या प्रयत्नाने 9 कोटींचा निधी मिळाल्याने पर्यटन विभागाचे सौंदयीकरणाचे काम सुरू आहे. यामुळे संपूर्ण हिंगणा शहरात झाडांची संख्या वाढवणे गरजेचे आहे.हिंगणा नगरपंचायत प्रशासनाने सण 2019च्या पावसाळ्यामध्ये एक हजार वृक्षलागवडीचा उपक्रम हाती घेतला आहे. सकाळ समूहाच्या सकाळ सोशल फाउंडेशन व नगरपंचायत प्रशासनाने शहरात वृक्षदिंडी व जनजागृती रॅली काढून वृक्षारोपणाचे महत्त्व नागरिकांना पटवून देण्यात आले.राज्याच्या वनमंत्रालयातर्फे 33 कोटी वृक्षलागवडीची मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेचा एक भाग म्हणून वृक्षलागवडीसाठी विविध प्रजातींचे एक हजार वृक्ष आणण्यात आले. सहा ते सात फूट उंचीचे सर्व वृक्ष आहेत. वृक्ष लावल्यानंतर लोखंडी टी गार्ड लावून जनावरांपासून त्याचे संरक्षण केले जात आहे. शहरातील 17 वॉर्डांत वृक्षलागवडीचे हे काम जवळपास पूर्णत्वास आले आहे. वृक्षलागवड मोहिमेत नगराध्यक्ष छाया भोसकर, उपाध्यक्ष हेमलता देशमुख, गटनेते अजय बुधे, विरोधी पक्षनेते गुणवंत चामाटे यांच्यासह सर्व सभापती व नगरसेवकांचे सहकार्य लाभत आहे. हिंगणा शहर येत्या काळात हिरवेगार करण्यासाठी जनतेने प्रत्येक वॉर्डात लावलेल्या वृक्षाचे संवर्धन करावे, असे आवाहन नगरपंचायत प्रशासनाने केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Green City will be a liar