रस्त्यारस्त्यांवर हिरव्या किड्यांचे थवे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 नोव्हेंबर 2016

नागपूर - गाडीवर जाताना सध्या ते छोटे छोटे किडे खूप त्रास देताहेत ना... डोळ्यांत जाताहेत... डोक्‍यावर केसांमध्ये वळवळ करताहेत... किंवा अगदी कोल्डकॉफीच्या ग्लासवर दिसल्याने "ईईई' असंही होतंय ना! वैताग आणणाऱ्या या छोट्या किड्यांचे आगमन सुरू झाले आहे. सध्या नागपुरातील रस्त्यांवर तुरळक प्रमाणात आढळणारे हे किडे लवकरच नागपूरकरांना त्रासदायक ठरणार आहेत.

साधारणत: या किड्यांचे आगमन हिवाळ्यात सुरू होते. गेल्या काही दिवसांपासून पहाटे आणि रात्रीच्या वेळी थंडी जाणवत आहे. सध्या या शीतलहरीचा आनंद नागपूरकर घेत आहेत. यादरम्यान हिरव्या रंगाच्या किड्यांचे आगमन झाले आहे. याविषयी एसएफएसमध्ये प्राणिशास्त्राचे सहायक प्राध्यापक असलेले डॉ. दिलीप सावरकर यांच्याकडून जाणून घेतले असता ते म्हणाले, ""अशा किड्यांचे आगमन तापमानात बदल झाला की सुरू होते. मागील वर्षीदेखील याच कालखंडात या किड्यांचा हैदोस वाढला होता. अशीच स्थिती यंदादेखील होण्याची शक्‍यता आहे. तापमानात झालेला बदल या किड्यांसाठी पोषक असून, ते लाखोंच्या संख्येने दिसून येतील. हे कीटक घातक नाहीत किंवा त्यांच्यामुळे मानवी आरोग्यास धोका नाही. पुढील काही दिवस कीटक रस्त्यावर असेच दिसण्याची शक्‍यता आहे. नागपुरात यापूर्वी ऍफिडस्वॉर्म, कायरोनॉमस, पतंग आदी किड्यांचा त्रास बरेचदा झाला आहे. मात्र, सध्या दिसत असलेले किडे त्यांच्या वर्गातील नसून पूर्णत: वेगळे आहेत. सोपेचे किडे विषारी, घातक नसले तरी डोळ्यांत जाण्यापासून संरक्षण करायला हवे.''

बेडकांची घटती संख्या कारणीभूत
नद्यांच्या पाण्यामध्ये सांडपाणी आणि रसायनयुक्त पाणी मिसळल्याने या पाण्याच्या प्रदूषणाची पातळी खूप वाढली. आता या पाण्यासोबतचा नदीपात्रात गाळ साचला आहे. या गाळामुळे बेडकांची संख्या कमी झाली. या प्रकारच्या किड्यांना बेडूक आणि वटवाघूळ खातात. त्यामुळे, किडे इतक्‍या जास्त प्रमाणात दिसून येत नाहीत. मात्र, प्रदूषित जलसाठ्यांमुळे बेडकांची संख्या कमी झाल्याचा हा दुष्परिणाम असल्याचे डॉ. सावरकर म्हणाले.

Web Title: green worms on road