मेळघाटातील धरणांचा ग्रीड तयार करणार : पालकमंत्री बोंडे

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 ऑगस्ट 2019

अमरावती : मेळघाटातील लघुप्रकल्प पावसाळ्यात लवकर भरतात आणि उर्वरित पाणी वाहून जाते. उन्हाळ्यात मात्र पाणीटंचाईची स्थिती निर्माण होते. या पार्श्‍वभूमीवर लघुप्रकल्पांचा ग्रीड तयार करण्याचे संकेत कृषिमंत्री तथा पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी शुक्रवारी (ता. नऊ) जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रपरिषदेत दिले.

धारणी व चिखलदरा तालुक्‍यात एकूण 15 लघुप्रकल्प आहेत. धारणी व चिखलदऱ्याचे वार्षिक पर्जन्यमान अनुक्रमे 1172 व 1526 मिलीमीटर आहे. दोन्ही तालुक्‍यांचे पर्जन्यमान इतर 12 तालुक्‍यांच्या तुलनेत 400 ते 800 मिलीमीटरने अधिक आहे. असे असले तरी दोन्ही तालुक्‍यांना उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. यासाठी मेळघाटातील लघुप्रकल्पांचा ग्रीड तयार करण्यासाठी अभ्यास समिती गठित करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. समितीच्या अहवालानुसार निर्णय घेतला जाईल, असेही पालकमंत्र्यांनी सांगितले.
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Grid to be constructed in Melghat Dam: Guardian Minister Bonde