तक्रार निवारण समितीपुढे प्रा. साठे दोषी

छायाचित्र
छायाचित्र

नागपूर : आंतरिक गुणांसाठी आर्थिक फायदा करवून घेण्याच्या प्रयत्नात असलेल्या सावनेर येथील डॉ. मिलिंद साठे या प्राध्यापकाला महाविद्यालयस्तरावर असलेल्या तक्रार निवारण समितीने दोषी ठरविले. विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेतील गुणाच्या आधारावर प्रात्यक्षिक परीक्षेचे गुण देण्यात यावे अशी शिफारस समितीने केली आहे. याशिवाय प्रा. मिलिंद साठे यांच्या कारवाईसाठी संस्थेला अधिकार दिला आहे.
प्रा. मिलिंद साठे यांनी उन्हाळी परीक्षेत तब्बल 125 विद्यार्थ्यांचे आंतरिक गुण दिले नाही. ऑगस्ट महिन्यात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा कला शाखेचा निकाल जाहीर झाला. दरम्यान, निकाल हाती आल्यावर विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण झाल्याचे कळले. अधिक माहिती घेतली असता, महाविद्यालयाकडून विद्यापीठाला आंतरिक गुण मिळाले नसल्याने 125 विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठाकडे प्रकरणाची तक्रार केली अन्‌ तपास समितीने शिक्षकाला दोषी ठरवत विद्यार्थ्यांना परीक्षेचे गुण देण्याची विनंती केली आहे. यामागे प्रा. साठे यांनी विद्यार्थी नियमित महाविद्यालयात हजर नसल्याचे कारण दिले. विद्यापीठाने दामोदर पराते यांच्या अध्यक्षतेखाली तपास समितीची निवड केली. विशेष म्हणजे या समितीत विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे यांचा समावेश होता. यावेळी डॉ. साठे यांना संपूर्णत: नैसर्गिक न्याय देण्यात आला. त्यानंतर झालेल्या चौकशीच्या आधारावर समितीने विद्यापीठाकडे अहवाल सादर केला. या अहवालानुसार प्रा. मिलिंद साठे याला दोषी ठरविण्यात आले आहे. विशेष म्हणजे केवळ पैशाच्या हव्यासापोटी शिक्षकाने विद्यार्थ्यांवर दबाव आणल्याचा ठपकाही समितीने त्याच्यावर लावत विद्यार्थ्यांना गुण देण्याची विनंती विद्यापीठाकडे केली. त्यानुसार संपूर्ण प्रकरणाची चौकशी विद्यापीठस्तरावरील चौकशी समितीमार्फत करण्यात आली. या चौकशीतही प्रा. साठे दोषी आढळले आहे. मात्र, यावेळी त्यांनी अनुत्तीर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेच्या गुणांच्या आधारावर प्रात्यक्षिक परीक्षेचे गुण देण्याचा निर्णय घेण्यात आला. याशिवाय समितीने त्यांच्यावर कारवाई करण्याचे अधिकार संस्थेला प्रदान केले. आता संस्था नेमकी कोणती कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. अभय मुदगल यांच्याशी संपर्क साधला असता, तो होऊ शकला नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com