विमा ग्राहक देण्याचे आमिष देऊन सामूहिक बलात्कार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 नोव्हेंबर 2019

आरोपींमधील महिला ही पीडितेची त्याच कंपनीतील सहकारी होती. तिला काही दिवसांपूर्वी कामावरून कमी केले होते. असलेल्या जुन्या ओळखीमुळे आरोपींनी पीडितेला तालुक्‍यातील खडकी येथे बोलावले आणि गुंगीचे औषध देऊन तिला शेतशिवारात नेले. त्या ठिकाणी पीडितेच्या इच्छेविरुद्ध तिन्ही आरोपींनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.

सेलू (जि. वर्धा) : विमा एजन्ट असलेल्या एका महिलेला ग्राहक मिळवून देण्याचे आमिष दाखवून तिच्यावर तिघांनी लैंगिक अत्याचार केला. तसेच या घटनेचा व्हिडिओ काढून तो व्हायरल करण्याची धमकी देत पीडित महिलेला पाच लाख रुपयांची मागणी केली. पीडितेच्या तक्रारीवरून सेलू पोलिसांनी एका महिलेसह चार आरोपींना अटक केली. आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना 11 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. 
सेलू पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला नागपूर येथे एका खासगी कंपनीत विमा एजन्ट आहे. पॉलिसी काढण्याच्या कामावरून तिची आरोपी उज्ज्वल रणनवरे (रा. सालई), होमा ऊर्फ प्रकाश बावणे (रा. हिंगणी), शंकर चिकराम (रा. धानोली गावंडे) यांच्याशी ओळख झाली.

आरोपींमधील महिला ही पीडितेची त्याच कंपनीतील सहकारी होती. तिला काही दिवसांपूर्वी कामावरून कमी केले होते. असलेल्या जुन्या ओळखीमुळे आरोपींनी पीडितेला तालुक्‍यातील खडकी येथे बोलावले आणि गुंगीचे औषध देऊन तिला शेतशिवारात नेले. त्या ठिकाणी पीडितेच्या इच्छेविरुद्ध तिन्ही आरोपींनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.

यावेळी उपस्थित सहकारी महिलेच्या सांगण्यावरून घटनेचा व्हिडिओ तयार केला. नंतर हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन पीडित महिलेला पाच लाख रुपयांची मागणी केली. मागणी पूर्ण होत नसल्याचे पाहून आरोपी महिलेने तो व्हिडिओ व्हायरल केला. पीडित महिलेच्या तक्रारीवरून सेलू पोलिसात महिलेसह चार आरोपींवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Group rape by insurer paying insurance customer