‘जीएसटी’ चुकीचा नाही सांगताना फुटतोय घाम

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 जून 2018

नागपूर - वस्तू व सेवा कर (जीएसटी) कायदा सर्वपक्षीच्या संमतीने लागू झाला असतानाही विरोधकांकडून सरकारला लक्ष्य केले जात आहे. त्यामुळेच ‘जीएसटी’ कायदा चुकीचा नाही, हे सांगताना आम्हाला घाम फुटत असल्याचे विधान केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी आज येथे केले. 

नागपूर - वस्तू व सेवा कर (जीएसटी) कायदा सर्वपक्षीच्या संमतीने लागू झाला असतानाही विरोधकांकडून सरकारला लक्ष्य केले जात आहे. त्यामुळेच ‘जीएसटी’ कायदा चुकीचा नाही, हे सांगताना आम्हाला घाम फुटत असल्याचे विधान केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी आज येथे केले. 

इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडियाची (आयसीएआय) नागपूर शाखा आणि डब्ल्यूआयआरसी ऑफ इंडियातर्फे आयोजित विदर्भ कॉनक्‍लेव्हच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार अनिल सोले तर प्रमुख पाहुणे म्हणून डब्ल्यूआयआरसीचे अध्यक्ष संदीप केसी जैन, सचिव पुरुषोत्तम खंडेलवाल, अभिजित केळकर, नागपूर शाखेचे अध्यक्ष उमंग अग्रवाल, किरिट कल्याणी, उत्तमप्रकाश अग्रवाल, सुरेन दुरुगकर, जयदीप शहा उपस्थित होते. 

अहीर म्हणाले, देशातील कर न भरण्याची मानसिकता बदलविण्याची क्षमता सनदी लेखापालांमध्ये आहे. देशात फक्त दोन ते तीन टक्केच नागरिक कराचा भरणा करतात. ही संख्या वाढावी, अशी अपेक्षा सरकारची आहे. पंतप्रधान मोदी यांनी नोटाबंदीचा धाडसी निर्णय घेतला. त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये पारदर्शकता आली आहे. 

देशाच्या विकासासाठी कर भरण्याची मानसिकता ठेवा, अन्यथा देशाचा विकास अशक्‍य आहे. देशाच्या रक्षणासाठी सीमेवर सैनिक अतिशय कठीण परिस्थितीत जीवन जगतात, हे दृश्‍य वेदना देणारे आहे. नागरिकांनी कर दिल्यास ती परिस्थिती बदलली जाऊ शकते, असेही त्यांनी सांगितले.  संचालन व आभार सुरेन दुरुगकर यांनी केले.

प्रस्ताव दिल्यास त्रुटींची दुरुस्ती
जीएसटीमध्ये काही त्रुटी आहेत त्या सुधारण्याची तयारी सरकारची आहे. प्रस्ताव दिल्यास त्रुटी दुरुस्त केल्या जातील. जीएसटी चांगल्या प्रकारे समजावून सांगण्याची जबाबजारी सनदी लेखापालांची आहे. अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेले विद्यार्थी कारखाने अथवा उद्योग न उभारता व्यापार करीत आहेत. अशा विद्यार्थ्यांनी ‘मेक इन इंडिया’मध्ये सहभागी होऊन उद्योग उभारावेत, देशाची अर्थव्यवस्था मजबूत करावी, असेही अहीर म्हणाले.

Web Title: GST Issue Hansraj Ahir