बनावट नोटांचे गौडबंगाल!

fake-note.jpg
fake-note.jpg

अकोला  ः डाबकी रोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या अमानतपूर येथील एक किराणा दुकानात शंभर रुपयांची बनावट नोटा चालविणाऱ्या दोघाना गावकऱ्यांच्या सतर्कतेमुळे डाबकी रोड पोलिसांनी अटक केली. आरोपीकडून शंभर रुपयांच्या २२ नोटा जप्त करण्यात आल्या असून, विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अकोला तालुक्यातील अमानतपूर ताकोडा येथील किराणा दुकानात आरोपी राहूल मोहन तायडे आणि जगदीश रमेश सपकाळे या दोघांनी शंभर रुपयांची नोट देऊन ९० रुपयांची खरेदी केली. हे दोन्ही भुरटे चोर दुकानातील लहान मुलगी व एक वृद्ध महिलेला फसवत असताना हा प्रकार एका वृद्ध महिलेच्या लक्षात आला. तिने याबाबत गावकऱ्यांना माहिती दिली. मात्र, तोपर्यंत हे चोर या गावाच्या बाजूलाच असलेल्या खडकी टाकळी या गावामध्ये गेले. अमानतपूर येथील गावकरी खडकी टाकळी जाऊन त्या भुरट्या चोरांना पकडून अमानतपूर येथील दुकानात आणले व गावकऱ्यांनी त्याची विचारपूस केली. यावेळी नकली नोट कोठून आणली अशी विचारणा केली असता चोरांनी सांगितले की, ‘ही नोट नजरचुकीने माझ्याकडे आली असेल, मला माहिती नाही’ परंतु गावकऱ्यांना त्याच्या संशयास्पद वागणुकीमुळे संशय आल्याने गावकऱ्यांनी त्या दोघांची तपासणी केली असता गावकऱ्यांना त्यांच्याकडे शंभर रुपयांच्या नकली नोटांचे बंडल आढळून आले. गावकऱ्यांनी दोन्ही आरोपींना डाबकी रोड पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर याप्रकरणाची चौकशी करून डाबकी रोड पोलिसांनी राहूल मोहन तायडे, जगदीश रमेश सपकाळे या दोघाकडून शंभर रुपयांच्या 22नोटा जप्त केल्या. आरोपीविरुद्ध कलम 489 ब,क अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बनावट नोटांचे औरंगाबाद कनेक्शन
मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, नांदेड, लातूर या मोठ्या व्यापारी बाजारपेठांमध्ये खोट्या नोटा चालविण्याचा उद्योग सध्या भामटे करीत आहेत. मराठवाड्यात अशांवर कारवाईही झाली आहे. तर आता या भामट्यांनी विदर्भाकडे मोर्चा वळवला असून, अकोल्यात झालेल्या या कारवाईमुळे या बनावट नोटांचे औरंगाबाद कनेक्शन नाकरता येत नाही. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com