मोदी तुम्ही चौकीदार नाही चोर आहात : जिग्नेश मेवानी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 29 मे 2018

दलितांना शपथ देणार - मेवानी
‘जीवनात कधी भाजपाला मतदान करणार नाही’ अशी शपथ बाबासाहेबांच्या नावाने राजस्थानमधील एक लाख दलितांना देणार आहे. महाराष्ट्रातही हेच करणार, मी जिवंत असेपर्यंत दलितांची मतं भाजपाला भेटू देणार नाही, असे जिग्नेश मेवानी यांनी म्हटले आहे.

नागपूर : स्वतःला चौकीदार म्हणणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विजय मल्ल्या आणि नीरव मोदी यांना भारताबाहेर जाताना का नाही अडवले. मोदी तुम्ही चौकीदार नाही चोर आहात, अशी जोरदार टीका गुजरातमधील आमदार जिग्नेश मेवानी यांनी केली.

नागपुर येथे आले असता जिग्नेश मेवानी यांनी मोदींवर जोरदार टीका केली. रिपब्लिकन युथ फेडरेशन व रिपब्लिकन स्टुडंन फेडरेशनतर्फे आयोजित मानवाधिकार परिषदेत जिग्नेश मेवानी बोलत होते. मोदी यांच्या काळात 90 हजार कोटी रुपयांचे घोटाळे झाले. मोदी तुम्हाला सोडणार नाही, तुम्ही गुजराती आणि तर मी पण गुजराती आहे. हा देश गोळवलकर यांच्या विचारावर नाही तर फुले, आंबेडकर आणि भगत सिंग यांच्या विचाराने चालणारा आहे, असे मेवानी यांनी म्हटले आहे.

जिग्नेश मेवानी म्हणाले, की देशात महिला, मुली आणि बहिणी सुरक्षित नाही, तर गायी सुरक्षित आहेत. भाजपचे लोक पुन्हा सत्तेत आले तर ते देशाचा हाल करतील, व्यक्ती स्वातंत्र्यावर निर्बंध घालतील. पंतप्रधान मोदी यांना संविधान नष्ट करून मनुस्मृती आणायची आहे, ते सुरक्षा रक्षक नाही, चोर आहेत. ज्या लोकांच्या खात्यात 2019 पूर्वी 15 लाख रुपये जमा झाले नाही त्यांनी मोदी यांच्या विरोधात 420 चा गुन्हा दाखल करावा. गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर काही संघी लोक त्यांना ट्विटरवर शिव्या घालत होते आणि मोदी त्यांना फॉलो करत होते. मोदी यांना फ्रॉड ऑफ दी सेंच्युरी पुरस्कार मिळायला हवा. जर भाजप एक हिंदू विरोधी पक्ष नाही, तर संघ आणि अभाविपच्या लोकांना तरी रोजगार द्या.

दलितांना शपथ देणार - मेवानी
‘जीवनात कधी भाजपाला मतदान करणार नाही’ अशी शपथ बाबासाहेबांच्या नावाने राजस्थानमधील एक लाख दलितांना देणार आहे. महाराष्ट्रातही हेच करणार, मी जिवंत असेपर्यंत दलितांची मतं भाजपाला भेटू देणार नाही, असे जिग्नेश मेवानी यांनी म्हटले आहे.

Web Title: Gujrat MLA Jignesh Mevani criticize Narendra Modi and BJP