गुलजार म्हणाले, "हे पुस्तक लोकनाथजींना द्या'

गुलजार यांनी स्वत:च्या हस्ताक्षरात लोकनाथ यांना दिलेले पुस्तक.
गुलजार यांनी स्वत:च्या हस्ताक्षरात लोकनाथ यांना दिलेले पुस्तक.

नागपूर : सभागृहात अचानक लगबग, सगळ्यांच्या नजरा व्यासपीठाकडे, प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखकाच्या पुस्तकाचे प्रकाशन होते, टाळ्यांच्या कडकडाटात प्रमुख पाहुणे त्यांनी स्वतः लिहिलेले पुस्तक लेखकाच्या हाती देत म्हणतात, "ये किताब अपने नागपुर के दोस्त लोकनाथजी को दे देना.'
गुजरातमधील अहमदाबाद येथे नुकताच घडलेला हा किस्सा सांगत होते सुप्रसिद्ध कवी, अनुवादक लोकनाथ यशवंत. नामवंत साहित्यिक जयंत परमार यांच्या पुस्तक प्रकाशनावेळी हा प्रसंग घडला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून संवेदनशील मनाचे आणि तरल काव्यप्रतिभेचे धनी, गीतकार, निर्देशक गुलजार उपस्थित होते. याविषयी लोकनाथ म्हणाले की, गुलजार यांचा मी निस्सीम चाहता आहे. त्यामुळे त्यांच्या हिंदीतील कविता मी मराठीत अनुवादित करीत असतो. मी लिहिलेली "बैल' ही कविता त्यांना फार आवडली. "बायोस्कोप' या चित्रपटात ही कविता गुलजार यांनी स्वतःचा आवाज देत वापरली आहे. यामुळे आमच्यातील नाते दृढ झाले. साहित्यिक जयंत परमार यांचा स्नेहही मला लाभला. त्यांच्या अहमदाबाद येथील पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला गुलजार यांनी माझी आठवण त्यांच्याकडे काढली व स्वतःचे एक पुस्तक जयंत यांच्याकडे देत ते मला द्यावे असे सांगितले. खरंच ही माझ्यासाठी मर्मबंधातली ठेव आहे.
"प्यार को प्यार ही रहने दो...'
काही वर्षांपुर्वी गुलजार एका कार्यक्रमासाठी नागपुरात आले होते. लोकनाथ यांना कशीबशी गुलजार यांना भेटण्याची संधी मिळाली. या संधीचे सोन्यात रूपांतर करणयासाठी लोकनाथांनी सरळ गुलजार यांना मिठी मारून त्यांच्या कानात "प्यार को प्यार ही रहने दो...' या गीताच्या ओळी पुटपुटल्या. गुलजार यांनी त्या ऐकल्याबरोबर स्मितहास्य करीत लोकनाथ यांची कडकडून भेट घेतली. हा किस्सा लोकनाथ यांनी गुलजार यांच्यासोबत पहिली भेट कशी झाली, असे विचारल्यावर सांगितला.

आपल्या रोल मॉडेलने आपली दखल घ्यावी यापेक्षा जास्त समाधान देणारी कोणतीच बाब नसते. ज्यांच्या कवितेवर, शायरीवर, गीतांवर मी जिवापाड प्रेम करतो अशा गुलजार साहेबांनी माझी आठवण काढून त्यांनी स्वतः लिहिलेले पुस्तक मला द्यावे असे सांगणे ही खरंच माझ्यासाठी आजन्म स्मरणात राहील अशी घटना आहे.
-लोकनाथ यशवंत, कवी, नागपूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com