पैनगंगा नदीत गुटख्याचा बुडून मृत्यू... हे कसं शक्य आहे? वाचा सविस्तर बातमी

gutkha smuggling in rural area of yavatmal
gutkha smuggling in rural area of yavatmal

फुलसावंगी (जि. यवतमाळ) : लॉकडाउनमुळे वाहतुकीची सर्व मार्ग मार्ग बंद आहे. चोरटी वाहतूक रोखण्यासाठी जिल्हा सीमा बंद करण्यात आल्या आहेत. पोलिस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आल्याने गुटखा खेप पोहचविण्यास अडथळा येत आहे. दरम्यान नदीपात्रात गुटख्याला जलसमाधी देऊन लाखो रुपयांवर पाणी फेरण्यात आले. यामागणी नेमके कारण अजूनही गुलदस्त्यातच आहे.

राज्यात गुटखा बंदी असली तरी चोरट्यामार्गाने तस्कर मालामाल होत आहे. गुटखाबंदीला सात वर्ष झाली आहेत. मात्र, परिस्थिती प्रत्यक्षात वेगळीच आहे. मेळाच्या नाल्यापासून पैनगंगा नदीपात्र जवळपास एक किलोमिटर अंतरावर आहे. एक किमी जलप्रवाहात गुटख्याचे बोरे पसरले आहे. चाळीस पेक्षा जास्त कट्टे असल्याचा अंदाज आहे. परिसरातील शेतकऱ्यांनी उत्सुकतेपोटी कट्टा उघडून बघितला असता, प्रतिबंधित असलेला नागपुरी व नजर गुटखा आढळून आला. चोख पोलिस बंदोबस्तामुळे वाहतूक करण्यात अडथळा आल्याने गुटख्याची विल्हेवाट लावण्यात आल्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. विशेष म्हणजे आठच दिवसापूर्वी उमरखेड येथे वीस लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला होता.

मुख्य सूत्रधार कोण ?

फुलसावंगीसारख्या ग्रामीण भागात एवढी मोठी खेप पाण्यात फेकण्यात आली. या वरून गुटखा तस्करी किती फोफावली हे लक्षात येते. यामागे अमरावती, कारंजा, आर्णी की आणखी कुणी मुख्य सूत्रधार आहे, हे शोधण्याचे आवाहन पोलिस आणि अन्न व औषध प्रशासन विभागापुढे उभे ठाकले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com