एटीएम फोडणाऱ्या हायटेक चोरट्यास अटक 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018

नागपूर - गॅस कटरच्या मदतीने तीन एटीएम फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न करणारा लक्ष्मण सुभाष जयसिंगपुरे (24, मानबस्ती ले-आउट, कळमना) या चोरट्यास लकडगंज पोलिसांनी अटक केली. चोरी करण्याची त्याची हायटेक पद्धत होती. 

नागपूर - गॅस कटरच्या मदतीने तीन एटीएम फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न करणारा लक्ष्मण सुभाष जयसिंगपुरे (24, मानबस्ती ले-आउट, कळमना) या चोरट्यास लकडगंज पोलिसांनी अटक केली. चोरी करण्याची त्याची हायटेक पद्धत होती. 

5 ऑगस्टला वर्धमाननगरातील आयडीबीआय बॅंकेचे एटीएम गॅस कटरने कापून चोरी करण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला. वासुदेव देशमुख (रा. केशवनगर, जयताळा) यांनी लकडगंज पोलिस ठाण्यात तक्रार दिली. वर्धामाननगरातील अन्य एटीएम अशाच प्रकारे लुटण्याचा प्रयत्न उघडकीस आला. त्यानंतर पाचपावलीतील वैशालीनगरातील एटीएमही अशाच प्रकारे फोडण्याचा प्रयत्न झाल्याचे उघडकीस आले. हायटेक असलेल्या चोरट्याचा पोलिस शोध घेत होती. 14 ऑगस्टला पोलिस गस्त करीत असताना एका घरासमोर दुचाकी संशयास्पद स्थितीत उभी केलेली दिसली. दुचाकीचा मालक लक्ष्मण याची चौकशी केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देत होता. त्याला खाक्‍या दाखवताच एटीएम फोडीचा प्रयत्न केल्याची कबुली दिली. 

सीसीटीव्हीवर मारायचा स्प्रे 
लक्ष्मण हा चेहऱ्याला कापड बांधून एटीएममध्ये प्रवेश करीत होता. लगेच सीसीटीव्हीवर स्प्रे मारत होता. त्यानंतर गॅस कटरने पैशाचा रकाना कापत होता. गुन्हे करण्याची सारखी पद्धती आणि सीसीटीव्हीच्या मदतीने पोलिसांनी लक्ष्मणला अटक केली.

Web Title: hacking the ATM was arrested in nagpur