निम्म्याहून अधिक महाराष्ट्र राहतो नागपूर जिल्ह्यात

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 26 ऑगस्ट 2018

नागपूर  : लोकसंख्यावाढीच्या दरात नागपूर जिल्ह्याने देशातीलच नवे, तर जगभरातील सर्व शहरांना मागे टाकले आहे. 2011च्या तुलनेत नागपूर जिल्ह्यातील लोकसंख्या गेल्या सात वर्षांत 12 पटींनी वाढली आहे. जिल्ह्याची सध्या लोकसंख्या 6 कोटी 3 लाख 83 हजार 628 आहे. महाराष्ट्रातील निम्म्यापेक्षा अधिक लोक नागपूर जिल्ह्यात राहत आहेत. ऐकून आश्‍चर्य वाटेल; मात्र हे खरे आहे. जिल्हा प्रशासनाच्या दरबारी तशी नोंद आहे.

वाढती लोकसंख्या भारतासाठी चिंतेचा विषय आहे. लोकसंख्या नियंत्रणासाठी प्रशासनाकडून अनेक उपाययोजना होत असल्या, तरी नागपूरकर लोकसंख्यावाढीत सर्व जगात अग्रसेर असल्याचे प्रशासनाच्या आकड्यातून दिसते. राज्याची लोकसंख्या सव्वाअकरा कोटींवर असल्याचे सांगण्यात येते. राज्याची राजधानी असलेल्या मुंबई जिल्ह्याची लोकसंख्या सर्वाधिक असल्याचे दावा शासनाकडून करण्यात येत असला, तरी हा दावा जिल्हा प्रशासनाने खोडला आहे. मुंबई जिल्ह्याच्या तुलनेत नागपूर जिल्ह्यातील लोकसंख्या दुपटीपेक्षा जास्त आहे. 2011 मध्ये नागपूर जिल्ह्याची लोकसंख्या 46 लाख 53 ह जार 171 होती. सात वर्षांत ती 12 पटींनी वाढून 6 कोटी 3 लाख 83 हजार 628 झाल्याचा दावा प्रशासनाचा आहे.
वेबसाईटवर त्रुटींची जंत्री
राज्यातील सर्व जिल्ह्यांची वेबसाईट तयार करण्यात आली आहे. बाहेरील व्यक्तींना माहितीसाठी याचा आधार होतो. त्यामुळे वेबसाईटवरील माहिती "अपडेट' असावी, अशा शासनाच्या सूचना आहेत. मात्र, नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वेबसाईटमध्ये अनेक त्रुटी आहेत. जिल्ह्यात पोलिस चौक्‍या 60च्या वर असताना वेबसाईटवर मात्र दोनच नमूद आहेत. पर्यटनस्थळांचीही अपूर्ण माहिती आहेत. अनेक स्थळे दर्शविण्यात आलेली नाहीत.

Web Title: half maharashtra live in nagpur