क्षुल्लक कारणावरून भोसकले

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 डिसेंबर 2018

नागपूर : ठेल्यावर बसून दारू पीत असताना धक्‍का लागल्याच्या क्षुल्लक कारणावरून दोन गटांत तलवारी निघाल्या. या हल्ल्यात अमोल चंद्रभान सयाम (24, रा. उदगी, ता. उमरेड) हा युवक पोटात तलवार भोसकल्याने गंभीर जखमी झाला. त्याला मेडिकलमध्ये दाखल केले आहे.

नागपूर : ठेल्यावर बसून दारू पीत असताना धक्‍का लागल्याच्या क्षुल्लक कारणावरून दोन गटांत तलवारी निघाल्या. या हल्ल्यात अमोल चंद्रभान सयाम (24, रा. उदगी, ता. उमरेड) हा युवक पोटात तलवार भोसकल्याने गंभीर जखमी झाला. त्याला मेडिकलमध्ये दाखल केले आहे.
रवी दिलीप डोंगरे (27, रा. उदगी, ता. उमरेड) व अमोल हे चार मित्रांसह रविवारी पार्टी करण्यासाठी नागपुरात आले होते. ते रात्री साडेआठ वाजता खरबी रोडवर असलेल्या पायल वाइन शॉपमधून दारू घेऊन समोरच असलेल्या अंड्याच्या ठेल्यावर दारू पीत बसले. तेथे दारू पिण्यासाठी ग्लास घेत असताना अमोलचा धक्‍का अनोळखी 30 वर्षांच्या युवकाला लागला. दोघांत बाचाबाची झाली. दोघांनीही एकमेकांना पाहून घेण्याची धमकी दिली.
आरोपीने "फक्‍त 10 मिनिटे थांब, तुला दाखवतो', असे धमकावत काही साथीदारांना बोलावले. चाकू, तलवारी व गुप्ती घेऊन काही युवक तिथे पोहोचले. युवकांना पाहून चार जणांनी पळ काढला तर अमोल थांबला. आरोपींनी अमोलवर सपासप वार करून ठार मारण्याचा प्रयत्न केला. काही वेळातच नंदनवन पोलिस तेथे पोहोचल्याने मोठा अनर्थ टळला. पोलिसांनी जखमी अमोलला मेडिकलमध्ये दाखल केले. आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. नंदनवन पोलिसांनी तक्रारीवरून गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला आहे.
रस्त्यांवरील ठेलेचालकांवर अंकुश हवा
शहरात अनेक ठिकाणी अंडा, मच्छीफ्रायचे हातठेले "मिनीबार' झाले आहेत. ठेलेचालक दारू पिणाऱ्यांना ग्लास, पाणी, चकना अन्य साहित्य उपलब्ध करून देतात. त्यामुळे ठेल्यांवर गुन्हेगारांचा जमावडा असतो. अजनीतील रामेश्‍वरी रोड, हुडकेश्‍वर रोडवर हातठेल्यांची मोठी रांग दिसते. मात्र, कोणतीही कारवाई होत नसल्यामुळे हातठेले गुन्हेगारांचा अड्डा बनत आहेत.

Web Title: half murder news