हे सभागृह काही सदस्यांनी हायजॅक केलंय - सुनील देशमुख

सिद्धेश्वर डुकरे
बुधवार, 18 जुलै 2018

आमदार सुनील देशमुख म्हणाले की, आम्हाला संधी मिळत नाही. कारण काही सदस्यांनी हे सभागृह हायजॅक केले आहे.

नागपूर :  हे सभागृह काही सदस्यांनी हायजॅक केले आहे. कारण काही सदस्य कामकाजाचा वेळ खात आहेत, असे मत आमदार सुनील देशमुख यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात मांडले. यावर अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी 'कोणी हायजॅक केले नाही. पुढच्या बाकावरील सदस्यांना बोलायला संधी दयावी लागते आणि सदनात एखादा मुद्दा आला तर ती सदनाची प्रॉपर्टी होते. त्यावर कोणीही सदस्य बोलू शकतो,' असे स्पष्ट केले.

सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील माण व भीमा नदीच्या पत्रातून अवैध वाळू उपसा प्रश्नावर चर्चा सुरू होती. यावेळी बोलताना विविध सदस्यांनी आपल्या मतदारसंघातील वाळू प्रश्नाबाबत चर्चा केली. यावेळी आमदार सुनील देशमुख म्हणाले की, आम्हाला संधी मिळत नाही. कारण काही सदस्यांनी हे सभागृह हायजॅक केले आहे.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: This hall has been hijacked by some members said Sunil Deshmukh