हलबा आंदोलनाला हिंसक वळण

File photo
File photo

हलबा आंदोलनाला हिंसक वळण  
नागपूर, ता. 19 : हलबा समाजाला आरक्षणाचा घटनादत्त अधिकार मिळण्यासह वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी हलबा क्रांती सेनेने 15 नोव्हेंबरपासून अनिश्‍चितकालीन उपोषण सुरू केले आहे. राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी या आंदोलनाला हिंसक वळण लाभले. शहरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी बस फोडून मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला.
वेगळ्या विदर्भासह संविधानाने दिलेला आरक्षिणाचा अधिकार हलबा समाजाला मिळावा या मागण्यांसाठी गेल्या पाच दिवसांपासून युवानेते कमलेश भगतकर यांनी अनिश्‍चितकालीन उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या आंदोलनाची धग सर्वत्र पसरली असून समाज पेटू लागला आहे. त्याचे पडसादही आज शहरात दिसून आले. लकडगंज हद्दीतील गंगाबाई घाट चौकात आपली बसच्या काचा फोडण्यात आल्या. जयताळाहून निघालेली ही बस खरबीला जात होती. गंगाबाई घाट चौकात बसमधून प्रवासी उतरत असताना चार बुरखेधारी तरुणांनी अचानक दगडफेक करीत समोरची काच आणि चालकाच्या बाजूचा आरसा फोडून नुकसान केले. यानंतर दुपारी दीडच्या सुमारास लकडगंज हद्दीतील महावीर चौकातून जाणाऱ्या बसवर दगफडेक करून काचा फोडण्यात आल्या. चालकाच तक्रारीनुसार चार बुरखेधारी युवक मोटारसायकलवरून आले. त्यांनी लाकडी बॅट आणि दगडांनी काचा फोडल्या. दोन्ही प्रकरणांची तक्रार संबंधित पोलिसांकडे करण्यात आली आहे. उपोषणस्थळी गर्दी करण्यापेक्षा सरकारचे लक्ष वेधण्यासाठी गरज पडेल ती भूमिका घेऊ, असा इशारा आंदोलक तरुणांनी दिला.
अन्याय सहन करणार नाही
संविधानाने अधिकार देऊनही आम्हाला शिक्षण, नोकरी, रोजगारापासून वंचित ठेवले गेले आहे. यापुढे अन्याय सहन करणार नाही. बस फोडण्याच्या घटना ही केवळ सुरुवात असून यापुढे गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, या शब्दात तरुणांनी रोष व्यक्त केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com