सरकार जाताच अनधिकृत धार्मिकस्थळांवर हातोडा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 जुलै 2018

नागपूर : अधिवेशन संपुष्टात येताच मनपाने अनधिकृत धार्मिकस्थळांवर कारवाई तीव्र केली. आज रविवार सुटीचा दिवस असूनही लक्ष्मीनगर, धंतोली झोनमध्ये एकूण दहा अनधिकृत धार्मिकस्थळे हटविण्यात आली. उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर महापालिकेने 22 जूनपासून शहरातील अनधिकृत धार्मिकस्थळे हटविण्यास प्रारंभ केला. महापालिकेच्या या कारवाईला काही प्रमाणात विरोध झाला. दरम्यान, अधिवेशनानिमित्त सरकार नागपुरात आले. शहरात अधिवेशन सुरू असताना कारवाई केल्यास रोष वाढविण्याच्या भीतीने महापालिकेने कारवाई बंद केली होती. शुक्रवारी सरकार मुंबईत परताच महापालिकेने अनधिकृत धार्मिकस्थळांविरुद्ध कारवाईचे अस्त्र उगारले.

नागपूर : अधिवेशन संपुष्टात येताच मनपाने अनधिकृत धार्मिकस्थळांवर कारवाई तीव्र केली. आज रविवार सुटीचा दिवस असूनही लक्ष्मीनगर, धंतोली झोनमध्ये एकूण दहा अनधिकृत धार्मिकस्थळे हटविण्यात आली. उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर महापालिकेने 22 जूनपासून शहरातील अनधिकृत धार्मिकस्थळे हटविण्यास प्रारंभ केला. महापालिकेच्या या कारवाईला काही प्रमाणात विरोध झाला. दरम्यान, अधिवेशनानिमित्त सरकार नागपुरात आले. शहरात अधिवेशन सुरू असताना कारवाई केल्यास रोष वाढविण्याच्या भीतीने महापालिकेने कारवाई बंद केली होती. शुक्रवारी सरकार मुंबईत परताच महापालिकेने अनधिकृत धार्मिकस्थळांविरुद्ध कारवाईचे अस्त्र उगारले. आज लक्ष्मीनगर झोनअंतर्गत खामला येथे हनुमान मंदिर भुईसपाट करण्यात आले. यासह आणखी दोन धार्मिक स्थळे हटविण्यात आली. धंतोली झोनअंतर्गत सात अनधिकृत धार्मिकस्थळांवर कारवाई करण्यात आली. यात महालचाही समावेश आहे. या सर्व मंदिरांना मनपाने नोटीस बजावली होती. कारवाईदरम्यान मोठ्या प्रमाणात पोलिस ताफा होता. धार्मिकस्थळे हटविताना नागरिकांनी मोठी गर्दी केली. अधिवेशनापूर्वी महापालिकेने जवळपास 70 अनधिकृत धार्मिकस्थळे हटविली. आता पुन्हा कारवाई सुरू केली.

Web Title: hammer on the unauthorized religious places