विद्यापीठातील धार्मिक स्थळांवर हातोडा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 जुलै 2019

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात असलेल्या दर्गा आणि मंदिराचे अतिक्रमण हटविण्यासाठी महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने विद्यापीठाला पत्र पाठविले आहे. या पत्राचा आधार घेत, विद्यापीठ परिसरातील दोन दर्गा आणि एका शिवमंदिरावर शुक्रवारी (ता. 26) महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने हातोडा फिरवित मंदिर जमीनदोस्त केलेत. अकरा जुलैला या मंदिर आणि दर्ग्यातील ट्रस्टला प्रशासनाकडून नोटीस बजावण्यात आली होती.

1923 साली विद्यापीठाची स्थापना झाली. जवळपास काही वर्षांतच महाराजबाग आणि अमरावती मार्गावर विद्यापीठाला कार्यालय आणि विभागासाठी जागा देण्यात आली. जवळपास 1964 सालापासून महाराजबाग परिसरातील कार्यालयात सय्यद हजरत पैलवान बाबा आणि विद्यापीठ परिसरात एका दर्ग्याची स्थापना करण्यात आली. यानंतर एलआयटी परिसरात शिवमंदिरही तयार करण्यात आले. गेल्या अनेक वर्षांपासून या परिसरात विद्यापीठाचे कर्मचारी आणि इतर भाविक येतात. काही महिन्यांपूर्वीच महापालिकेद्वारे उच्च न्यायालयातील याचिकेचा आधार घेत, शहरातील अनधिकृत जागांवर असलेल्या मंदिरावर बुलडोजर चालविण्याचे काम सुरू करण्यात आले होते. मात्र, नागरिकांच्या रोषालाही सामोरे जावे लागले होते. यानंतर उच्च न्यायालयाने अधिकृत यादी मागविण्यात आली. त्यानंतर महापालिकेकडून कारवाई बंद करण्यात आली. यानंतर महापालिकेकडून विद्यापीठ परिसरात असलेल्या मंदिर आणि दर्ग्याचे अतिक्रमण हटविण्यासाठी पत्र पाठविण्यात आले. त्यावरून प्रशासनाने या तिन्ही धार्मिक स्थळांना नोटीस पाठविली. यानुसार 18 जुलैलाच अतिक्रमण हटविण्याची कारवाई होणार होती. मात्र, काही तांत्रिक अडचणीमुळे या दिवशी ती कारवाई होऊ शकली नाही. त्यानुसार आज शुक्रवारी महापालिकेकडून ही कारवाई करण्यात आली. यावेळी परिसरात मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावण्यात आला होता.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hammers at the religious sites of the university