मुलाच्या साखरपुडापूर्व विधीतून सामाजिक संदेश

राज इंगळे
बुधवार, 5 डिसेंबर 2018

अचलपूर (जि. अमरावती) : केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या मुलाचा विवाह परतवाडा येथील एका मध्यमवर्गीय कुटुंबातील कोमल नंदवंशी या मुलीसोबत जुळला. साखरपुडापूर्वीचा विधी येथे आज, बुधवारी अगदी साधेपणाने साजरा करण्यात आला. त्यामुळे केंद्रीय मंत्र्यांनी समाजासमोर एक आदर्श घातला आहे.

साखरपुडापूर्वीचा हा कार्यक्रम अत्यंत साध्या पारंपरिक पद्धतीने ज्येष्ठ समाजसेवक शंकरबाबा पापळकर यांच्या उपस्थित पार पडला. हंसराज अहीर आणि जुळ्या शहराचे नाते पूर्वीपासून जुळलेले आहे. त्यांच्या दोन बहिणींचा विवाह परतवाडा येथे तर तिसऱ्या बहिणीचा विवाह अचलपूर येथे झाल्याने त्यांचे नाते होतेच. मात्र, आता त्यांचे नाते शहराशी अधिक घट्ट झाले आहे. त्यांच्या एकुलता एक रघुवीर या मुलाचा विवाह परतवाडा येथील मध्यमवर्गीय गोकूळ नंदवंशी यांच्या कोमल या मुलीशी जुळला. मात्र, त्यांनी व्हीआयपी संस्कृतीला बाजूला ठेवत साध्यापणाने हा विधी करून राजकीय पुढारी आणि इतर श्रीमंतांपुढे एक आदर्श निर्माण केला आहे.
निवडणुकीच्या व्यस्त कार्यक्रमांमुळे स्वतः हंसराज अहीर येथे उपस्थित नव्हते. त्यांच्या मोठ्या बंधूंच्या उपस्थितीत मात्र हा विधी पार पडला.
या समाजातील साखरपुडापूर्व विधीमध्ये मुलीचा असो वा मुलाचा, यामध्ये दोघांच्याही वडिलांना मान घेता येत नसून मोठ्या बंधूंचा मान असल्याचे स्वतः हंसराज अहीर यांच्या मोठ्या बंधूंनी सांगितले.

Web Title: hansaraj ahir`s son got engage