हंसराज अहीर भाजपचे राष्ट्रीय सहनिवडणूक अधिकारी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 जुलै 2019

यवतमाळ : माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांची भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीयस्तरावर सह निवडणूक अधिकारी म्हणून निवड करण्यात आली आहे. चंद्रपूर-आर्णी लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार हंसराज अहीर यांच्यावर पक्ष संघटनेत महत्त्वपूर्ण जबाबदारी देण्यात आली आहे. राष्ट्रीयस्तरावर जिल्ह्याला पहिल्यांदाच संधी मिळाली आहे. भाजपचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह यांनी पदाधिकाऱ्यांची यादी प्रसिद्ध केली आहे. त्यात हंसराज अहीर यांच्यावर राष्ट्रीय सह-निवडणूक अधिकारी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hansraj Ahir, BJP's National Election Officer