गुणवत्तेसाठी "आनंददायी शिक्षण प्रकल्प'

मंगेश गोमासे ः सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 सप्टेंबर 2019

नागपूर : गणित आणि इंग्रजीची भीती घालवण्यासोबतच विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्‍वास निर्माण करण्यासाठी शिक्षण विभागातर्फे नागपूर व अमरावती विभागातील काही शाळांमध्ये आनंददायी शिक्षण प्रकल्प राबविण्याचा विचार केला जात आहे. तत्पूर्वी तो खरोखरच विद्यार्थ्यांना प्रेरक ठरेल काय? हे तपासण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील किमान दहा ते बारा शाळांमध्ये "पायलट प्रोजेक्‍ट'ला सुरुवात केली आहे.

भाषा, गणित आणि विज्ञान विषय पुस्तकातून ते शिकताना ते विद्यार्थ्यांच्या डोक्‍यावरून जातात. त्यांना त्यात कुठलीही रुची वाटत नाही. अनेक विद्यार्थी फक्त उत्तीर्ण होण्यासाठी घोकमपट्टी करतात. हेच विषय अगदी सहज सोप्या पद्धतीने तसेच चित्रीकरण करून मनोरंजनात्मक शिकवल्यास ते विद्यार्थ्यांच्या मनात चिरकाल टिकून राहते. विविध उपक्रमांच्या माध्यमातून तो विषय शिकविल्या गेल्यास त्याचा विद्यार्थ्यांनाही बराच फायदा होतो. यातून शिक्षन विभागाने आनंददायी उपक्रमास सुरुवात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी जिल्ह्यात वेळाहरी केंद्रातील 10 ते 12 शाळांची निवड करण्यात आलेली आहे. या शाळांमधील पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांचा समावेश करण्यात आला आहे. यासाठी केंद्रातील विषय सहाय्यक धनराज राऊळकर,ज्योती बोंद्रे यांची निवड करण्यात आली आहे.

असा आहे प्रकल्प
प्रकल्पात चार थिमवर काम करायचे असून त्यात "परसबाग' या थिमनुसार विविध झाडे, फुले आणि शैक्षणिक साहित्यातून विद्यार्थ्यांना शिक्षण द्यायचे आहे. समाज सहभागातून भौतिक सुविधा व इतर शैक्षणिक वस्तूंची जुळवाजुळव करणे, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास आणि अभिव्यक्ती विकासावर भर देणे, मराठी, इंग्रजी आणि गणित या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येईल. यासाठी विषय सहाय्यकांनी अमरावती येथून प्रशिक्षणही घेतले आहे.
विद्यार्थ्यांचा भाषा आणि गणित विषयातील पाया मजबूत करण्यासाठी आणि त्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी हा प्रकल्प राबविण्यावर भर देण्यात येत आहे. सध्या जिल्ह्यातील दहा ते बारा शाळांमध्ये "पायलट प्रोजेक्‍ट राबविण्यात येत आहे.
-ज्योती बोंद्रे, विषय सहाय्यक.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: "Happiness Education Project" for Quality