आली दिवाळी : रंगीबेरंगी आकाशदिव्यांनी सजली बाजारपेठ

file photo
file photo

गोंदिया  : दिवाळीचा सण जवळ येत आहे. प्रकाशाच्या या सणात दिव्यांचा मान आहे. महालक्ष्मीच्या स्वागतासाठी घराच्या दारापासून अवघे घर प्रकाशमान केले जाते. यात दिव्यांच्या मंद प्रकाशाला आकाशदिव्यांच्या लखलखाटाची साथ महत्त्वाची असते. म्हणूनच दिवाळीच्या दिवशी दिवे लावण्याचा मान असतानाच त्याच्यासोबत आकाशदिवा हा हमखास लावला जातो. घरासमोर प्रकाश देणारा आकाशदिवा आता घरोघरी दिसून येणार आहे. नेमकी हीच बाब हेरून विक्रेते दरवर्षी आकशदिव्यांच्या नवनवीन व्हेरायटी ग्राहकांसाठी घेऊन येतात. त्यानुसार यंदाही बाजारपेठ रंगीबेरंगी वेगवेगळ्या प्रकारच्या आकाशदिव्यांनी सजलेली दिसून येत आहे. ग्राहकांची आतापासूनच खरेदीसाठी गर्दीही दिसून येत आहे. सध्या भारतीय बाजारपेठेत चायनीज वस्तूंची चांगलीच चलती असताना आकशदिव्यांनाही आता चायनीज ज्वर चढला होता. नागरिक स्वतः पुढाकार घेत आपल्याच पारंपरिक आकाशदिव्यांची मागणी करीत आहे. यामुळे चायनीज आकाशदिव्यांना मागणी घटत चालली आहे. बाजारातील विक्रेत्यांशी चर्चा केली असता त्यांनी नागरिकांकडून यंदा भारतीय आकाशदिव्यांची मागणी केली जात आहे. त्यामुळे चायनीज आकाशदिवे अत्यंत कमी प्रमाणात विकले गेले. परिणामी आम्हीही भारतीय आकशदिवेच जास्त प्रमाणात आणल्याचे सांगितले. विशेष म्हणजे, कापडी दिवेही उपलब्ध असून ते पुन्हा वापरता येत असल्याने त्यांचीही मागणी आहे.
---
25 रुपयांपासून अडीचशे रुपयांपर्यंत दिवे
सध्या बाजारात 25 रुपयांपासून 250 रुपयांपर्यंतच्या आकाशदिव्यांची रेंज दिसून येत आहे. यापेक्षाही जास्त दराचे आकाशदिवे विक्रीसाठी आहेत. मात्र, ग्राहक जास्त महाग आकाशदिव्यांची खरेदी न करता मध्यम रेंजच्या दिव्यांना पसंती देत असल्याचे विक्रेते सांगतात. यातही आता आकाशदिव्यांत कापडांपासून तयार केलेले दिवे बाजारात आले आहेत. कापडांचे असल्याने त्यांना स्वच्छ करून नीट ठेवल्यास पुढील वर्षीही त्यांचा वापर करता येतो. त्यामुळे कागदांच्या आकाशदिव्यांऐवजी कापडांच्या आकाशदिव्यांची खरेदी ग्राहक जास्त करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com