आनंदवार्ता : विदर्भातील या जिल्ह्याचे कोरोनामुक्तीकडे ‘चवथे पाऊल..’!

corona negative patient in buldana.jpg
corona negative patient in buldana.jpg

बुलडाणा : कोरोनाचा संसर्ग जगभर वेगाने वाढत आहे. भारतातही काही हॉट स्पॉट क्षेत्रात विषाणूने गंभीर परिस्थिती निर्माण केली आहे. जिल्ह्यातही विषाणूने आपला संसर्ग दाखवित 21 रुग्ण आपल्या कवेत घेतले. मात्र, जिल्ह्यातील परिस्थिती प्रशासनाच्या अथक प्रयत्नाने नियंत्रणात येत आहे. कोरोनाला मर्यादेत ठेवण्यात प्रशासन विविध उपाययोजना अंमलात आणत आहे. जिल्ह्याचे कोरोनामुक्तीकडे आता चवथे यशस्वी पाऊल पडले आहे. ठणठणीत बरे झाल्याने व कोरोना निगेटिव्ह अहवाल इाल्यामुळे जिल्ह्यातील तीन रुग्णांना आज कोविड रुग्णालयातून सुटी देण्यात आली.

जिल्ह्यात चिखली येथे तीन, चितोडा ता. खामगाव येथे दोन, शेगाव येथे तीन, देऊळगाव राजा येथे दोन, सिंदखेड राजा येथे एक, मलकापूर येथे चार आणि बुलडाणा येथे सहा कोरोनाबाधीत रुग्ण आढळले होते. त्यापैकी आतापर्यंत बुलडाणा येथील चार, शेगाव येथील तीन, चितोडा ता. खामगाव येथील दोन, चिखली येथील एक आणि दे.राजा येथील एक कोरोनाबाधीत रुग्ण बरे होवून घरी परतले आहे. त्यामध्ये आज तीन रुग्णांची भर पडली आहे. आज चिखली येथील एक, दे.राजा येथील एक आणि मलकापूर येथील एक अशाप्रकारे तीन रुग्ण बरे होवून स्वगृही परतले आहेत. अशाप्रकारे एकूण 14 रुग्ण बरे झालेले आहे.

प्रशासनाने कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात उपाययोजना केल्या. कन्टेन्टमेंट झोन, अनावश्यक बाहेर फिरणाऱ्यांवर कारवाई, गर्दी कमी करण्यासाठी योजलेले उपाय यामुळे जिल्हा कोरोनामुक्तीकडे अग्रेसर आहे. आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून राबविलेल्या उपाययोजनांमुळे आज तीन रूग्णांचे दुसरे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहे. त्यांना आनंदाने जिल्हाधिकारी सुमन चंद्रा, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील-भुजबळ, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडीत यांच्यासह सर्व डॉक्टर्स, नर्सेस, ब्रदर्स यांनी टाळ्या वाजवून बरे झालेल्या रूग्णांचे स्वागत केले.  

शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार उपचारादरम्यान संबंधित रुग्णांचे दाखल केल्यापासून 14 व 15 दिवसानंतरचे दोन्ही अहवाल तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. दोन्ही तपासणी अहवाल निगेटीव्ह आल्याने सदर रुग्णांना डिस्जार्ज देण्यात आला आहे.  त्यांच्यावर उपचार करणारे सिस्टर्स व ब्रदर्स यांनी टाळ्या वाजवित त्यांना प्रोत्साहित केले. कोरोना बाधीत रूग्णांनी आपण कोरोनामुक्त झाल्याबद्दल प्रशासनाने आभार मानेल. खरच.. आमच्यासाठी सर्व प्रशासनाने खूप मेहनत घेतली, अशा भावनाही त्यांनी व्यक्त केल्या आहेत.

कोरोना निगेटिव्ह रुग्णांना जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक व जिल्हा शल्य चिकित्सक यांनी डिस्जार्ज पेपर दिला. त्यानंतर रुग्णवाहिकेतून संबंधित रुग्णांना त्यांच्या घरी सोडण्यात आले. या तीन रुग्णांमुळे जिल्ह्यात कोरोनापासून बरे झालेल्या रुग्णांची संख्या 14 झाली आहे. जिल्ह्यात कोविड -19 आजाराने 21 रुग्ण बाधीत होते. त्यापैकी एकाचा 28 मार्च रोजी मृत्यू झाला होता. त्यानंतर 17 एप्रिल रोजी तीन, 20 एप्रिल रोजी पाच, 23 एप्रिल रोजी तीन व आज 25 एप्रिल रोजी पुन्हा 3 रूग्णांना बरे झाल्यामुळे घरी सोडण्यात आले. 

आता सहा रुग्णांवर कोविड रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या कोरोनाबाधीत रुग्णांना तपासणी अहवालानंतर कोरोना संसर्ग वार्डात दाखल करून या सर्वांवर उपचार करण्यात आले. तसेच शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार या रुग्णांवर तसेच जिल्ह्यात संशयित आढळून येणाऱ्या रुग्णांवर शासकीय रूग्णालयातील आयसोलेशन कक्षात तपासणी, उपचार करण्यात आले. कोरोना बाधित आढळलेल्या या व्यक्तींचे दोन्ही स्वॅब घेवून तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. पहिला व दुसरा तपासणी रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचा अहवाल प्राप्त झाला. दोन्ही अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाल्याने शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार सदर बाधीत रूग्ण कोरोना मुक्त झाल्याने त्यांना आज डिस्चार्ज देवून घरी सोडण्यात आले.

सर्व कोरोना निगेटीव्ह रूग्णांचे चेहरे आनंदीत
कोरोनाच्या या जीवघेण्या आजारातून वाचलेल्या सर्व कोरोना निगेटीव्ह रूग्णांचे चेहरे आनंदीत होते. सर्व मनोमन आरोग्य यंत्रणेतील डॉक्टर्स, नर्सेस यांचे आभार मानत होते. कोरोनापासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी अजूनही लॉकडाउनचे पालन करावे, घरातून विनाकारण बाहेर पडू नये. सर्वांनी मास्क किंवा स्वच्छ हात रुमाल चेहऱ्यावर ठेवावा. अनावश्यक बाहेर  न पडता घरातच रहावे, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.            

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com