कृषी अधिकाऱ्यांच्या त्रासामुळे कर्मचाऱ्यांची सामूहिक बदलीची मागणी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 5 मे 2018

खामगाव (बुलडाणा) : तालुका कृषी अधिकारी संजय ढाकणे मानसीक त्रास देत असल्याचा आरोप करत त्यांच्यावर कारवाई करावी अन्यथा आमची सामूहिक बदली करावी, अशी मागणी येथील कृषी विभागाच्या 50 कर्मचाऱ्यांनी आयुक्तांकडे केली आहे.

खामगाव (बुलडाणा) : तालुका कृषी अधिकारी संजय ढाकणे मानसीक त्रास देत असल्याचा आरोप करत त्यांच्यावर कारवाई करावी अन्यथा आमची सामूहिक बदली करावी, अशी मागणी येथील कृषी विभागाच्या 50 कर्मचाऱ्यांनी आयुक्तांकडे केली आहे.

खामगाव तालुका कृषी अधिकारी म्हणून प्रभार 1 नोव्हेंबर 2016 पासून संजय ढाकणे यांच्याकडे आहे. त्यांच्या मनमानी कारभाराच्या चौकशीकरिता कृषी सहाय्यक संघटना खामगावच्या वतीने कृषी आयुक्तांना पत्र देण्यात आले. त्यात नमूद आहे की, प्रभार स्वीकारल्या पासून कृषी अधिकारी संजय ढाकणे वेळोवेळी होणाऱ्या कार्यालयीन बैठकीत योग्य मार्गदर्शन न करता अशासकीय भाषा वापरतात. कार्यालयीन वेळेव्यतिरिक्त रात्री बेरात्री फोन करुन दबाव तंत्राचा वापर करतात तसेच वरीष्ठ कार्यलयास तुमचा खोटा अहवाल अशी धमकीही त्यांच्याकडून दिल्या जात आल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे. या सर्व प्रकाराची बाहेरील जिल्ह्यातील अधिकारी यांच्याकडून चौकशी करून संजय ढाकणे यांच्यावर प्रशासकीय कारवाई करावी तसेच त्यांना खामगाव येथून त्वरित हटवावे अशी मागणीही कृषी सहायक संघटनेने केली आहे. कृषी आयुक्तांना दिलेल्या पत्रावर संघटनेचे खामगाव अध्यक्ष एन. डी. धामणकर, सचिव एन. डी. कोळी यांच्यासह 50 कर्मचाऱ्यांच्या सह्या आहेत.

खामगाव तालुक्यातील जलयुक्त शिवार, कांदा चाळ यासह सर्वच कामे चांगली झाली. आमच्या बाबत एकाही शेतकऱ्याची तक्रार नाही. मी हेतू  पुरस्सर कुणालाही काही बोललो नाही. वेळोवेळी चांगल्या सूचना केल्या. माझ्या विरोधात केलेली तक्रार चूकीची आहे.
- संजय ढाकणे , 
तालुका कृषी अधिकारी खामगाव

Web Title: harassment by agriculture officer demand by employees for group transfer