हार्दिक पटेल प्रचाराला येणार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 सप्टेंबर 2019

नागपूर : गुजरातमधील कॉंग्रेसचे युवा नेते हार्दिक पटेल यांनी महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीत प्रचारासाठी येण्याची इच्छा व्यक्त केली आहे. कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष नितीन राऊत यांनीही त्यांना निश्‍चितच प्रचाराला बोलाऊ, असे सांगून त्यांचे स्वागत केले.

अकोला येथे कार्यक्रमाला जाण्यासाठी हार्दिक पटेल नागपूरला आले होते. या दरम्यान ते नितीन राऊत यांच्या घरी गेले. राऊत यांच्या निवासस्थानी सुमारे एक तास दोघांनी आगामी विधानसभेच्या निवडणुकीवर चर्चा केली. महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती जाणून घेतली. कॉंग्रेसची तयारी तसेच इतर राजकीय घडामोडींवरही त्यांनी चर्चा केली. यानंतर त्यांनी नितीन राऊत यांना गुजरातमध्ये येण्याचे निमंत्रण दिले.
हार्दिक पटेल यांनी गुजरातमध्ये पाटीदार समाजाच्या आरक्षणासाठी मोठे आंदोलन उभे केले आहे. गुजरातमध्ये त्यांच्या आंदोलनाची सत्ताधारी भाजपने चांगलीच धास्ती घेतली होती.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hardik Patel will join election campaign