ताडोबा बफर क्षेत्रात हातभट्ट्या

file photo
file photo

चिमूर (जि. चंद्रपूर) : शहरालगतच्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात पोलिसांनी छापा टाकून 26 लाख 92 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यात तेरा हजार 560 किलो सडवा आणि 610 लिटर मोहफुलाच्या दारूचा समावेश आहे. जिल्ह्यात बंदीनंतर दारू माफिया सक्रिय झाले आहेत. वेगवेगळ्या क्‍लृप्त्या केल्यानंतरही पोलिसांकडून कारवाया केल्या जात आहेत. त्यामुळे दारूविक्रेत्यांनी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्राकडे मोर्चा वळविला आहे. जंगली भागात पोलिसांची नजर चुकवून हा व्यवसाय तेजीत सुरू होता. माणुसमारी जंगलात मोठ्या प्रमाणात सडवा आणि मोहफुलाच्या हातभट्ट्या सुरू असल्याची माहिती चिमूर पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिस निरीक्षक स्वप्नील धुळे यांच्या नेतृत्वात पोलिसांची जंगलात सर्च मोहीम राबविली. यावेळी 13 हजार 560 किलो सडवा, 610 लिटर मोहफुलाची दारू आणि आठ हजार 600 रुपये किमतीचे साहित्य असा एकूण 26 लाख 92 हजार 900 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. यावेळी सूरज गजभिये, आशीष शंभरकर व दागो वरखेडे हे हातभट्टीचालक पसार झाले. ही कारवाई पोलिस उपनिरीक्षक किरण मेश्राम, पोलिस उपनिरीक्षक राजू गायकवाड, विलास निमगडे, किशोर बोढे, सचिन गजभिये, विनायक सरकुंडे, सुशील आठवले, सचिन साठे, कैलास आलाम, देविदास रणदिवे, विजय उपरे यांच्या पथकाने केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com