हवालदारांनी मानले सकाळचे आभार 

अनिल कांबळे
शुक्रवार, 15 जून 2018

नागपूर - शहर पोलिस दलातील जवळपास अडीच हजार पोलिस हवालदारांना येत्या 15 दिवसांत एकरकमी वाढीव वेतन मिळणार असल्याचे वृत्त "सकाळ'ने गुरूवारी प्रकाशित केले होते. या वृत्ताचे कात्रण आज पोलिस कर्मचाऱ्यांच्या अनेक वॉट्‌सऍप ग्रूपवर फिरत होते. अनेकांनी फोनवरून, मॅसेजद्वारे तर सोशल मिडियाच्या माध्यमातून "सकाळ'चे धन्यवाद मानले. प्रत्येकाच्या बॅंक खात्यात जवळपास 90 हजार ते 1 लाख 20 हजार रूपयांपर्यंतची रक्‍कम जमा होणार असल्यामुळे पोलिस हवालदार वर्गांत आनंदाचे वातावरण आहे. 

गुरूवारच्या अंकात "सकाळ'ने हवालदारांसाठी "मान्सून बोनान्झा' या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले. या वृत्तानंतर शहर पोलिस दलातील तब्बल अडीच हजार पोलिस हवालदारांमध्ये उत्साह आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले. या वृत्ताची पोलिस आयुक्‍त डॉ. के. वेंकटेशम्‌ यांनी गांभीर्याने दखल घेतली. पोलिस मुख्यालयाचे उपायुक्‍त रविंद्रसिंह परदेशी यांनी लिपिक वर्गाची तत्काळ बैठक घेतली. पोलिस हवालदारांचे वाढीव वेतनाचा मुद्‌दा निकाली काढला. त्यासाठी प्रत्येकांच्या सेवा पुस्तिका "अपडेट' करण्याचे काम सुरू केले. वाढीव वेतनश्रेणीनुसार 2006 पासून ते 2018 पर्यंतचे वाढीव वेतनाची 90 ते एक लाख 20 हजार रूपये हवालदारांच्या खात्यात जमा होणार आहे. या निर्णयामुळे अनेकांच्या मुलांच्या ऍडमिशन, शैक्षणिक खर्च तसेच पावसाळापूर्वीची कामे निपटणार आहेत. त्यामुळे हवालदार वर्ग खूश आहे. अनेकांनी "सकाळ' कार्यालयात फोन करून धन्यवाद दिले तर अनेकांनी वॉट्‌सऍप, फेसबूक, ट्‌वीटर आणि फोन करून आभार मानले, हे विशेष. 

Web Title: The Havaldars thanked the morning