esakal | उडीद पीक कापणीची वेळ अन् पावसाने केला खेळ...शेतकऱ्यांवर ओढवले नवीनच संकट
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

पीक काढणीच्या तोंडावर पाऊस आल्याने उडीद पिकाला फटका बसला आहे. मूग पिकाचे काही प्रमाणात नुकसान होण्याची शक्‍यता आहे. यंदा जवळपास पाच हजार हेक्‍टरवर उडीद व तेवढ्याच क्षेत्रावर मूग पिकाची लागवड झाली आहे. पावसाचा खंड व त्यानंतर सातत्याने येणाऱ्या पावसाने या दोन पिकांना फटका बसण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

उडीद पीक कापणीची वेळ अन् पावसाने केला खेळ...शेतकऱ्यांवर ओढवले नवीनच संकट

sakal_logo
By
चेतन देशमुख

यवतमाळ : गेल्या जुलै महिन्यापासून सुरू असलेल्या सततच्या पावसाने उडीद, मूग आदी कडधान्याच्या पिकांना फटका बसण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. कृषी विभागाने उडदाचे पीक कापणी प्रयोगाला सुरुवात केली असून, उत्पादनात घट येण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण दिसून येत आहे.

या वर्षी सुरुवातीपासूनच समाधानकारक पाऊस शेतकऱ्यांनी अनुभवला आहे. मृगनक्षत्रात हजेरी लावल्यानंतर पावसाने विश्रांती घेतली होती. त्यामुळे काही शेतकऱ्यांना दुबार पेरणीला सामोरे जावे लागले. त्यानंतरही पावसात सातत्य राहिले नाही. ऐन मूग, उडिदाच्या शेंगा भरण्याच्या कालावधीत पावसाला सुरुवात झाली. संततधार पावसामुळे आता उडीद उत्पादनात घट येण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.

पावसामुळे पिकांना फटका बसणार

पीक काढणीच्या तोंडावर पाऊस आल्याने उडीद पिकाला फटका बसला आहे. मूग पिकाचे काही प्रमाणात नुकसान होण्याची शक्‍यता आहे. यंदा जवळपास पाच हजार हेक्‍टरवर उडीद व तेवढ्याच क्षेत्रावर मूग पिकाची लागवड झाली आहे. पावसाचा खंड व त्यानंतर सातत्याने येणाऱ्या पावसाने या दोन पिकांना फटका बसण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. कृषी विभागाने उडीद पिकाचे पीककापणी प्रयोग सुरू केले आहेत. लवकरच एकरी उत्पादनाचा आकडा हाती येण्याची शक्‍यता आहे. मात्र, काही भागांतील प्रयोगातून उडीद पिकाचे उत्पादन घटण्याचा अंदाज कृषी विभागाकडून व्यक्त केला जात आहे.

असं घडलंच कसं : आई-वडील कामावर तर बहीण मैत्रिणीकडे गेल्याने पूजा घरात एकटीच होती, मग...


लागवडखर्चावर आधारित असावा हमीभाव

उडीद पिकासाठी शेतकऱ्याला एका एकराला सरासरी चार ते पाच हजार रुपये लागवड खर्च येतो. आता उत्पादनात प्रचंड घट येत असल्याने शेतकऱ्यांचे बजेट कोलमडत असल्याचे दिसून येते. एरवीही चार ते सहा क्विंटलदरम्यान एकरी उत्पादन होत असते. या वर्षी तीन ते चार क्विंटलदरम्यान उत्पादन होण्याचा अंदाज आहे. असे झाल्यास शेतकऱ्यांना हंगामाच्या सुरुवातीलाच मोठ्या आर्थिक नुकसानाचा सामना करावा लागण्याची शक्‍यता आहे. लागवडखर्चावर आधारित हमीभाव नसल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत अधिकच भर पडत आहे. त्यामुळे आता शासन यासंदर्भात काय धोरण ठरविणार, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

जाणून घ्या : पाऊस आला आणि खरीप पिकाचे नुकसान करून गेला


पीककापणी प्रयोगाला सुरुवात
जिल्ह्यात उडीद पिकाच्या पीककापणी प्रयोगाला सुरुवात झाली आहे. लवकरच अहवाल येईल. मात्र, काही दिवसांत झालेल्या पावसाने उडीद पिकाला फटका बसण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळे पाऊस थांबण्याची वाट शेतकरी बघत आहेत.
- नवनाथ कोळपकर, जिल्हा कृषी अधीक्षक, यवतमाळ.


(संपादन : दुलिराम रहांगडाले)

loading image