वादविवादाशिवाय हॉकर्सला जागा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 जानेवारी 2017

नागपूर : बर्डी ते मातृसेवा संघ या मार्गावरील हॉकर्सने लॉटरी पद्धतीने जागांचा ड्रॉ काढण्यास विरोध केल्याने निर्माण झालेल्या वादावर आज सामंजस्याने पडदा पडला. कुठल्याही वादाशिवाय या मार्गावर 60 हॉकर्सला जागा देण्यात आल्या. मात्र, मेयो रुग्णालय परिसरातील हॉकर्सच्या जागांसाठी लॉटरी पद्धतीचा वापर करण्यात आला. येथे 20 तर गणेशपेठ येथे 15 अशा एकूण 95 जागा महापालिकेने वितरित केल्याने अखेर हॉकर्सच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले.

बर्डी ते मातृसेवा संघ मार्ग, मेयो व गणेशपेठ बसस्थानक परिसरातील हॉकर्सला जागा देण्याबाबतची प्रक्रिया मंगळवारी महापालिकेतील स्थायी समिती सभागृहात पार पडली. सायंकाळपर्यंत झालेल्या या प्रक्रियेत उपायुक्त रवींद्र देवतळे, सहायक आयुक्त मिलिंद मेश्राम, स्थावर विभागप्रमुख आर. एस. भुते, हॉकर्स समिती सदस्य कौस्तुभ चॅटर्जी व हॉकर्स उपस्थित होते. बर्डी ते मातृसेवा संघ मार्गावरील जागा देण्याबाबत सोमवारी येथील हॉकर्सला बोलावण्यात आले होते. येथे 60 जागा असल्याने कुणाचीही बाजू घेऊन जागा दिल्याचा आरोप होऊ नये, यासाठी महापालिकेने लॉटरी पद्धतीचा प्रस्ताव पुढे केला होता. मात्र, अनेक वर्षांपासून ज्या जागांवर व्यवसाय थाटला, त्याच जागा देण्याचा हट्ट या हॉकर्सचा होता. त्यामुळे आम्ही सामंजस्याने मार्ग काढू, एक दिवस द्या, अशी मागणी त्यांनी अधिकाऱ्यांना केली होती. यात समिती सदस्य कौस्तुभ चॅटर्जी यांनी हॉकर्सला एक दिवस देण्याची विनंती अधिकाऱ्यांना केली. अखेर या हॉकर्सला जागा व त्यावरील विक्रेत्याची यादी सादर करण्यास एका दिवसाची मुभा देण्यात आली. हॉकर्सने 60 जागांची यादी सादर केली. अधिकाऱ्यांनी महापालिकेत नोंदणी केलेल्यांची नावे आहे की नाही, याबाबत तपासणी केली. यात नोंदणी नसलेल्या दोन, तीन हॉकर्स आढळून आले. ही बाब वगळता सर्वांना लॉटरी पद्धतीने ड्रॉ न काढता त्यांच्या मागणीनुसार जागा देण्यात आल्या. या मार्गावरील हातठेले चालकांनीही 28 जणांची यादी सादर केली. मात्र, मेयो रुग्णालय परिसरातील हॉकर्सना जागेसाठी ड्रॉ काढण्यात आला. येथे 15 जणांना जागा मिळाल्या. गणेशपेठ बसस्थानक परिसरातील हॉकर्सनेही यादी सादर केली होती. त्यांना त्यांच्या नियमित जागा देण्यात आल्या.

महापालिकेने प्रथमच सर्वांना न्याय देण्यासाठी पावले उचलली आहे. हॉकर्सनेही महापालिकेला सहकार्य करून नियमाने व्यवसाय करावा.
- कौस्तुभ चॅटर्जी, हॉकर्स समिती सदस्य.

Web Title: hawkers to get place