मिहानमध्ये एचसीएल 90 एकर जमीन घेणार

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नागपूर ः आयटी क्षेत्रातील आघाडीची कंपनी एचसीएल टेक्‍नॉलॉजीने मिहानमधील प्रकल्पाचा विस्तार करणार असून 90 एकर जमीन घेणार आहे. 18 ऑगस्टला एमएडीसी आणि एचसीएल यांच्यात सामंजस्य करार हॉटेल लि मेरिडियन येथे दुपारी साडे तीन वाजता होणार आहे. कंपनीचे संचालक संजय गुप्ता, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, एचसीएलचे व्ही.व्ही. अपुर्वा उपस्थित राहणार आहेत. यामुळे एचसीएलचे पश्‍चिम भारतातील सर्वात मोठे हब म्हणून पुढे येणार आहे.

मिहानमध्ये एचसीएलने 50 एकर जमीन खरेदी करून अत्याधुनिक कॅम्पस उभारले आहे. प्रतिभावंत युवकांना प्रशिक्षित करून 1,200 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना येथे रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे. नागपूरच्या या केंद्राने भारतातच नव्हे, तर जगातील प्रगत केंद्रात आपले नाव कोरले आहे. नव्याने खरेदी करणार असलेल्या 90 एकर जमिनीवर नवीन कॅम्पस उभारणार असून आयटी क्षेत्रातील हाय प्रोफाईल काम सुरू करण्याची योजना आहे. येत्या तीन वर्षांत गे नवीन कॅम्पस बांधून तयार केले जाणार आहे. यात 200 कोटींपेक्षा अधिक गुंतवणूक केली जाणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. तसेच दहा हजार युवकांना रोजगार दिला जाणार आहे. एचसीएल टेक्‍नॉलॉजीने मिहानमध्ये 140 एकर जागा घेतली होती. परंतु, अनेक कारणांचा पाढा वाचून कंपनीने येथे काम सुरू केले नव्हते. जागतिक मंदी, विजेचा प्रश्‍न आदी अडचणीमुळे एचसीलने येथील जमीन एमएडीसीला परत करण्याची मानसिक तयारी केली होती. दरम्यान, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची शिव नाडर यांच्यासोबत भेट झाली. गडकरी यांची शिव नाडर यांना जमीन परत करू नका आणि कॅम्पस सुरू करण्यासाठी गळ घातली. त्यानुसार नाडर यांनी पुन्हा 90 एकर जमीन खरेदी करण्याचा निर्णय घेतला. त्यावर 18 ऑगस्ट रोजी शिक्कामोर्तब होणार असून एमएडीसी आणि एचसीएल यांच्यात सामंजस्य करार होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com