गुडघ्याला बाशिंग बांधून करून आला लग्न आणि नववधुसह झाला क्वारेंटाईन

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 26 May 2020

कोरोना विषाणूने जिल्ह्यात आपले पाय घट्ट केले आहे. पन्नासच्या जवळ रुग्णसंख्या येऊन पोहोचली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनात खळबळ उडाली आहे. बाधित रुग्ण ज्या गावात आढळत आहेत, त्या गावांना कंटेंनंट झोन तर आसपासची गावे बफर झोन म्हणून घोषित करण्यात आली आहेत. नियमांची पायमल्ली करणा-यांवर दंडात्मक कारवाईसह गुन्हेही दाखल करीत आहेत. असे असताना बहुतांश जणांना कोरोना विषाणूचे गांभीर्य कळले नाही, हेच आजघडीला दिसून येत आहे. असाच काहीसा प्रकार आंबेतलाव येथे घडला.       

गोरेगाव (जि. गोंदिया) : कोरोना विषाणूबाधित रुग्ण आढळल्याने आंबेतलाव गाव कंटेन्टमेंंट झोन म्हणून घोषित करण्यात आला. संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तरीही कुठल्याही परिस्थितीत लग्न उरकायचेच असे नवरदेव व त्यांच्या कुटुंबियांनी ठाणले. मध्य प्रदेशात जाऊन विवाह आटोपला. मात्र, परतीच्या वेळी पोलिसांनी त्यांना गावसिमेवर गाठलेच. क्वारोंटाइन करीत गुन्हा दाखल केला. हा सारा प्रकार आंबेतलाव येथे २४ मे रोजी घडला.             
कोरोना विषाणूने जिल्ह्यात आपले पाय घट्ट केले आहे. पन्नासच्या जवळ रुग्णसंख्या येऊन पोहोचली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनात खळबळ उडाली आहे. बाधित रुग्ण ज्या गावात आढळत आहेत, त्या गावांना कंटेंनंट झोन तर आसपासची गावे बफर झोन म्हणून घोषित करण्यात आली आहेत. नियमांची पायमल्ली करणा-यांवर दंडात्मक कारवाईसह गुन्हेही दाखल करीत आहेत. असे असताना बहुतांश जणांना कोरोना विषाणूचे गांभीर्य कळले नाही, हेच आजघडीला दिसून येत आहे. असाच काहीसा प्रकार आंबेतलाव येथे घडला.          
झाले असे की, शनिवारी आंबेतलाव येथे कोरोनाबाधित एक रुग्ण आढळल्याने जिल्हाधिकारी व उपविभागीय दंडाधिकारी यांच्या आदेशान्वये आंबेंतलाव येथे प्रतिबंधात्मक उपाययोजनेनुसार, गाव कंटेनटमेंट झोन घोषित करण्यात आले आहे. तरीसुद्धा मुलाचे लग्न नियोजित तारखेला पार पाडण्यासाठी नवरदेवाचे वडील व नवरदेवाने  ठाणले.  नियोजित तारखेला वर रविवारी (ता. २४)  पोलिसांच्या नजरा चुकवूत वधू मंडपी पोहोचला. लग्न सोहळा पार पडला. लग्न सोहळा पार पडल्यावर नवरदेव नववधूला आंबेतलाव येथे घेवून येताच पोलिसांनी त्या तिघांविरोधात कंटेट्मेंन्ट झोन आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिस पाटील किशोर खोब्रागडे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर नववधू, नवरदेव व वरपित्याला गावातच कोरेनटाईन सेंटरवर कोरेनटाईन करण्यात आले आहे. पोलिस निरीक्षक सुरेश नारनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली  पोलिस हवालदार अरुण ईलमे तपास करीत आहेत.

अवश्य वाचा- चंद्रमौळी घरातील कबड्डीपटू शुभमचा खेळण्यासाठी नव्हे जगण्यासाठी संघर्ष

आनंदावर पडले विरजण

तीस वर्षीय युवकाने स्वतःच्या लग्न सोहळ्याचे स्वप्न पाहिले होते. ते साकार करण्यासाठी लग्नाची तारीख वडीलांच्या संमतीने ठरविली होती. पण हे स्वप्न कोरोनाने उद्ध्वस्त केले. धुमधडाक्यात बॅण्डच्या तालावर मित्र, नातलग  गावकरी यांच्या उपस्थितीत लग्न सोहळा पार न पाडता वडिलांना सोबत घेऊन लग्न केले. मात्र, नवरदेवाला वधू व वडील यांच्यासह गावातील कोरेनटाइन सेंटरवर कोरेनटाइन व्हावे लागले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: He married during lockdown and get quarantined