विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण करणाऱ्या मुख्याध्यापकास अटक 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 फेब्रुवारी 2017

गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या या प्रकाराबाबत पालकांनी पोलिसांना माहिती दिली. आरोपीने किमान तीस विद्यार्थिनींशी चाळे केल्याच्या तक्रारीनंतर पोलिस निरीक्षक अनिल पाटील व तहसीलदार दिलीप झाडे, निवासी नायब तहसीलदार मनोहर मेश्राम यांनी घटनास्थळ गाठले. शुक्रवारी सकाळी तुमाने याला नांदुरा (खुर्द) येथून अटक करण्यात आली. 

बाभूळगाव (जि. यवतमाळ) - तालुक्‍यातील नांदुरा (खुर्द) येथील जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकाने विद्यार्थिनीशी लैंगिक चाळे केल्याची घटना शुक्रवारी (ता. 11) उघडकीस आली. मुख्याध्यापक रमेश भाऊराव तुमाने (वय 50, रा. चांदोरेनगर, यवतमाळ) याला बाभूळगाव पोलिसांनी अटक केली आहे. 

यवतमाळ येथील वायपीएस व श्रीसतसाई विद्यानिकेतन या शाळांपाठोपाठ जिल्हा परिषद शाळेत हा प्रकार उघडकीस आल्याने संताप व्यक्त होत आहे. तुमाने हा नांदुरा (खुर्द) येथील जिल्हा परिषदेच्या दोन शिक्षकी शाळेचा मुख्याध्यापक आहे. यातील पीडित विद्यार्थिनीला शुक्रवारी (ता. 10) रात्री त्रास झाला. नातेवाइकांनी तिला विश्‍वासात घेऊन विचारणा केली असता, मुख्याध्यापक तुमाने तिच्याशी लैंगिक चाळे करत असल्याचे तिने सांगितले.

अशाच प्रकारच्या तक्रारी शाळेत शिकणाऱ्या अन्य विद्यार्थिनींनी पालकांकडे केल्या. त्यामुळे ग्रामस्थांनी ठाणेदार व तहसीलदार यांना भेटून तक्रार दाखल केली. एकूण पाच पालकांनी मुख्याध्यापकाविरुद्ध तक्रार केली आहे. 

गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या या प्रकाराबाबत पालकांनी पोलिसांना माहिती दिली. आरोपीने किमान तीस विद्यार्थिनींशी चाळे केल्याच्या तक्रारीनंतर पोलिस निरीक्षक अनिल पाटील व तहसीलदार दिलीप झाडे, निवासी नायब तहसीलदार मनोहर मेश्राम यांनी घटनास्थळ गाठले. शुक्रवारी सकाळी तुमाने याला नांदुरा (खुर्द) येथून अटक करण्यात आली. 

Web Title: Head of the sexual exploitation of girls arrested

टॅग्स