धक्कादायक! जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा पोहोचल्या आरोग्य केंद्रात; अन् कर्मचारीच गैरहजर

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 29 April 2020

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर कर्मचाऱ्यांकडून आरोग्य केंद्रातून दांडी मारल्या जात असल्याच्या तक्रारी जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष सावित्रीबाई राठोड यांना प्राप्त झाल्या होत्या. त्याची दखल घेत राठोड यांनी थेट मंगळवारी (ता.28) येथील आरोग्य केंद्राचा आढावा घेत सोई-सुविधांची पाहणी केली.

आगर (जि. अकोला) : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर कर्मचाऱ्यांकडून आरोग्य केंद्रातून दांडी मारल्या जात असल्याच्या तक्रारी जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष सावित्रीबाई राठोड यांना प्राप्त झाल्या होत्या. त्याची दखल घेत राठोड यांनी थेट मंगळवारी (ता.28) येथील आरोग्य केंद्राचा आढावा घेत सोई-सुविधांची पाहणी केली.

हेही वाचा- धक्कादायक ः वाळू माफियाचा प्रताप; पोलिस कर्मचाऱ्याला टिप्परखाली चिरडले

रुग्ण पाहत होते अधिकाऱ्यांची वाट
संपूर्ण देशात कोरोना विषाणूमुळे चिंतेचे वातावरण आहे. त्यासाठी पोलिस, आरोग्य विभाग तसेच महसूल यंत्रणा कर्तव्य तत्परतेने काम करीत आहेत. अशा स्थितीत आरोग्य विभागाच्या काही कर्मचाऱ्यांकडून कर्तव्यात कसूर सुद्धा केल्या जात असल्याचे पहायला मिळत आहे. या संदर्भातील तक्रारी जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष सावित्रीबाई राठोड यांच्याकडे येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी केल्या होत्या. याची दखल घेत राठोड यांनी मंगळवारी (ता.28) सकाळी दहा वाजता आगर येथील केंद्राची झाडाझडती घेतली. शिपाई, नर्स, वाहनचालक, आरोग्य सेवक यांच्या व्यतिरिक्त इतर कर्मचारी गैरहजर असल्याचे निदर्शनास आले. परिसरातील रुग्ण वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या प्रतीक्षेत होते. त्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त करीत कर्तव्यावरून दांडी मारणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचा इशारा दिला. यावेळी त्यांच्यासोबत उपसरपंच मोहन तायडे, वंचित बहुजन आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Health center staff absent