आरोग्य'च्या भरतीत सदस्यांचे "लॉबिंग'

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 ऑगस्ट 2019

अमरावती, ता.  ः अनेक वर्षांपासून नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या शिक्षित बेरोजगार तरुणांच्या आशा पल्लवित झाल्या असतानाच जिल्हापरिषदेच्या आरोग्य विभागातील भरती प्रक्रियेत उच्च पदस्थ अधिकारी तसेच जिल्हापरिषद सदस्यांचा हस्तक्षेप सुरू झाला आहे. परिणामी ज्यांचे कुणीच "गॉडफादर' नाही, अशा उमेदवारांचा पत्ताच कट होण्याचे जवळपास निश्‍चित झाले आहे.

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे पदभरतीची प्रक्रिया घेतली जाणार आहे. त्या अंतर्गत ऑडिओलॉजिस्ट, स्टाफ नर्स, पर्यवेक्षक, समुपदेशक, औषधी निर्माता, सांख्यिकी अन्वेषक, तंत्रज्ञ, वैद्यकीय अधिकारी, तालुका कार्यक्रम व्यवस्थापक, सामाजिक कार्यकर्ता, निओनेलॉजिस्ट अशा एकूण 102 पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे पदभरती केली जाणार आहे. 18 ते 29 जुलैदरम्यान अर्ज भरण्याची मुदत होती. पात्र, अपात्र उमेदवारांची यादी 3 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. 14 ऑगस्टला थेट मुलाखती घेतल्या जाणार आहेत. थेट मुलाखत पद्धतीने पदभरती होणार असल्याने शेकडो उमेदवारांचे अर्ज आरोग्य विभागाला प्राप्त झाले आहे. भरतीमधील पदांवर आपल्या मर्जीतील उमेदवारांची निवड करण्यासाठी काही सदस्यांनी आपल्या पदाचा वापर करीत जोरदार लॉबिंग सुरू केले आहे. अधिकारी तसेच प्रशासनावरसुद्धा दबाव आणला जात असल्याच्या तक्रारी बाहेर येवू लागल्या आहेत. परिणामी ज्यांचे कुणीच "गॉडफादर' नाहीत, अशा उमेदवारांची गच्छंती अटळ मानली जात आहे.

प्रशासनाकडून सारवासारव
प्रशासनाकडून असा कुठलाही प्रकार होत नसल्याची सारवासारव केली जात आहे. विशेष म्हणजे अधिकाऱ्यांच्या जवळच्या लोकांना यामध्ये भरपूर संधी असल्याचीही चर्चा सध्या जिल्हापरिषदेत सुरू आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Health 'recruitment' members' lobbying