एनएचएमच्या आंदोलनाने आरोग्य सेवा कोलमडली

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 25 मे 2018

अकोला  - राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन बेमुदत उपोषणाच्या वळणावर पोहोचले आहे. राज्यभरातील कंत्राटी कर्मचारी मुंबई येथील आझाद मैदानावर उपोषणास बसल्याने राज्यभरातील आरोग्य यंत्रणा कोलमडली आहे.

अकोला  - राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन बेमुदत उपोषणाच्या वळणावर पोहोचले आहे. राज्यभरातील कंत्राटी कर्मचारी मुंबई येथील आझाद मैदानावर उपोषणास बसल्याने राज्यभरातील आरोग्य यंत्रणा कोलमडली आहे.

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे ता. ८ मे पासून संपूर्ण कामबंद आंदोलनाला सुरूवात केली. जिल्हास्तरावर कामबंद आंदोलनाचा प्रभाव आरोग्य सेवेवर पडू लागला. त्यानंतरही शासनाने केवळ आश्वासने देऊन वेळ भागवण्याचा प्रयत्न केला. मात्र, ठोस निर्णय न झाल्याने कंत्राटी कर्मचाऱ्यांनी १८ मे पासून नाशीक ते मुंबई आझाद मैदान असा लॉगमार्चला सुरुवात केली. हा लॉगमार्च आझाद मैदानावर पोचल्यावर महासंघाने कामबंद आंदोलनाचे स्वरूप बदलून बेमुदत उपोषणामध्ये केले.

या आहेत प्रमुख मागण्या
समान काम समान वेतन
आशा गट प्रवर्तक यांना मानधन वाढ
एकत्रित वेतन
आशा स्वयंसेविकांना मानधन वाढ

शासनातर्फे केवळ आश्वासने
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी अधिकारी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला महिना होत आहे. महिनाभराच्या कालावधीत शासनातर्फे केवळ आश्वासने मिळत असल्याने कंत्राटी कर्मचाऱ्यामध्ये आक्रोश निर्माण झाला आहे.

जिल्ह्यातील स्थिती
जिल्ह्यात एनएचएमचे ४०२ अधिकारी, कर्मचारी
3० प्राथमिक आरोग्य केंद्र, 
पाच ग्रामीण रुग्णालय या सर्वांचा 
शासनाकडे पाठविण्यात येणारा दैनंदिन कामाचा अहवाल ठप्प

शासनाने पोकळ आश्वासने न देता थेट निर्णय द्यावा. कंत्राटी कर्मचाऱ्यांना त्यांच्या न्याय मागण्या पूर्ण होत नाही, तोवर उपोषण सुरू राहणार.- हर्षल रनवरे, माजी अध्यक्ष, अधिकारी, कर्मचारी महासंघ, महाराष्ट्र राज्य

Web Title: The health service collapsed by the NHM's agitation