आरोग्य विद्यापीठाचे पथक धडकले मेडिकलमध्ये 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 डिसेंबर 2018

नागपूर - शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) सोयीसुविधांची पाहणी करण्यासाठी नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे पथक सोमवारी धडकले. बाह्यरुग्ण विभागापासून तर वॉर्डांपर्यंत, कॅज्युअल्टीपासून तर ऑपरेशन थिएटरची पाहणी करून येथील त्रुटींची नोंद या पथकाने केली. एमबीबीएस तसेच एमडी अभ्यासक्रमांच्या वर्गखोल्यांच्या पाहणीपासून सुरुवात केली. 

मेडिकलमध्ये सोमवारी नांदेडवरून दाखल झालेल्या पथकात मानसोपचारतज्ज्ञ डॉ. प्रदीप बोडके, न्यायवैद्यक शास्त्राचे डॉ. हेमंत गोडबोले, बालरोगतज्ज्ञ डॉ. किशोर राठोड, आयुर्वेदिकतज्ज्ञ डॉ. मंगेश नळकांडे यांचा समावेश होता. मेडिकलमधील बाह्यरुग्ण विभागासह वॉर्ड, सुपर स्पेशालिटी रुग्णालय, ट्रॉमा केअरमध्ये या पथकाने निरीक्षण केले. एमबीबीएस तसेच एमडी या पदव्युत्तर अभ्यासक्रमाला असलेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येच्या तुलनेत त्यांच्या निवासाच्या सोयींसह उपलब्ध यंत्रसामग्री, पायाभूत सुविधा, अतिदक्षता विभागासह प्रयोगशाळा, लायब्ररी आणि मनुष्यबळासंदर्भात माहिती या पथकाने घेतली. नुकतेच मेयोत एमआरआय अद्याप लावण्यात न आल्यामुळे अलीकडेच वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे सचिव डॉ. संजय मुखर्जी यांनी नागपुरात बैठक घेतली. एमसीआयच्या निकषांची पूर्तता करण्याचे निर्देश दिले. 

सुपरची पाहणी 
सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्येही या पथकाने पाहणी केली. येथील ह्रदयरोग विभाग, न्युरोलॉजी विभागासह गॅस्ट्रोएन्टोलॉजी विभाग, युरोलॉजी विभाग, सीव्हीटीएस विभागाची पाहणी केली. यावेळी अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे, डॉ. सजल मित्रा, डॉ. सुधीर गुप्ता, डॉ. निकुंज पवार, डॉ. प्रमोद गिरी, डॉ. मुकुंद देशपांडे, डॉ. सुनील वाशिमकर, डॉ. गोपाल अग्रवाल, डॉ. फैजल मोहमंद उपस्थित होते. 

Web Title: health university's team is under medical supervision