सायबर पोलिस स्टेशनअभावी तक्रारींचा ढीग

अनिल कांबळे
शुक्रवार, 5 जुलै 2019

नागपूर : शहरात तांत्रिक प्रणालीद्वारे होणाऱ्या गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असून तपास करण्यासाठी सायबर क्राइम विभागात पुरेसे मनुष्यबळ नाही. सायबर गुन्हेगारांचे प्राबल्य वाढत असून हायटेक गुन्ह्यांमध्ये अचानक वाढ झाली आहे. यानिमित्त प्रस्तावित सायबर पोलिस स्टेशन केव्हा होईल? असा प्रश्‍न पोलिस विभागासह तक्रारकर्ते नागपूरकरांनाही पडला आहे.

गुन्हे शाखेच्या अंतर्गत सिव्हिल लाइन्समध्ये सायबर क्राइम विभाग कार्यरत आहे. पोलिस निरीक्षकांचीही नियुक्‍ती नसलेल्या सायबर क्राइममध्ये अपुरे मनुष्यबळ आहे. शहरातील पोलिस ठाण्यांची संख्या वाढत आहे. ठाण्यातील जवळपास 80 टक्‍के तक्रारींमध्ये सायबर क्राइम गुन्ह्याचा वापर आहे. गुन्ह्यांचा तपास आणि उकल करण्यासाठी सायबर क्राइमची भूमिका महत्त्वाची आहे. गुन्हेगारी कटामध्ये सामील आरोपींचे मोबाईल संभाषण, लोकेशन आणि फोटो-व्हिडिओ याबाबत तपास करायचा असल्यास सायबर क्राइम तपासात मदत करते. पुरावा जुळवाजुळव करण्यासाठी सायबर क्राइमचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्यामुळे शहरात सायबर पोलिस स्टेशन होणे गरजेचे आहे. सध्या सायबर क्राइममध्ये तीन सहायक पोलिस निरीक्षक आणि 22 पोलिस कर्मचारी असा केवळ 25 जणांचा स्टाफ आहे. त्यापैकी 3 ते 4 कर्मचारी दीर्घ रजेवर आहेत. त्यामुळे संपूर्ण शहरातील तपासाचा भार मूठभर कर्मचाऱ्यांवर येत असल्यामुळे दिवसेंदिवस कामाचा ताण वाढत चालला आहे. परिणामी याप्रकरणी आलेल्या तक्रारींचा उलगडा होत नसून ढिगारा वाढत आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The heap of complaints