भयंकर! सुन निघाली घर हडपायल

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 6 ऑक्टोबर 2019

नागपूर : आजोबा आणि काकाचे निधन झाल्यानंतर त्यांच्या संयुक्त नावावर असलेले 48 लाखांचे घर सुनेने कागदपत्रांमध्ये फेरफार करीत स्वत:च्या नावावर करून घेतल्याची घटना उघडकीस आली आहे. आरोपी सुनेने परस्पर दीर सुधीर हटनाकर व इतर वारसदारांचा हक्क डावलून कोणालाही माहिती होऊ न देता फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीर सुधीर श्रीरामबापू हटनाकर (43, रा. भावसार चौक, गांधीबाग) यांचे आजोबा गणपत हटनाकर व काका नीलकंठ गणपत हटनाकर यांच्या संयुक्त नावाने तहसील हद्दीतील गांधीबाग येथे 310 अ क्रमांकाचे घर आहे. 23 जुलै 2008 रोजी त्यांनी रजिस्टर मृत्युपत्र केल्याचे आरोपी सून नीलिमा सुनील हटनाकर (49, रा. भावसार चौक, गांधीबाग) यांना माहीत असूनसुद्धा त्यांनी घरावरील सुधीर हटनाकर व इतर वारसदारांचा हक्क डावलून कोणालाही माहिती होऊ न देता नीलकंठ गणपत हटनाकर हे मरण पावल्यानंतर परस्पर आमुख्तार नामपत्राच्या आधारे रजिस्ट्रीवर 48 लाखांचे घर स्वत:च्या नावावर करून घेतले. आरोपीने ही रजिस्ट्री विक्रीपत्र दुय्यम निबंधक, सक्करदरा नागपूर येथे करून फिर्यादी हटनाकर व इतर वारसदारांची फसवणूक केली. तक्रारीवरून तहसील पोलिसांनी आरोपीविुरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Heard trying to grab a house

टॅग्स