उन्हाच्या लाटेचा नवा इशारा 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 एप्रिल 2017

नागपूर -  मंगळवारी देशात सर्वाधिक तापमानाचा उच्चांक गाठणाऱ्या चंद्रपूरसह विदर्भातील बहुतांश शहरांच्या तापमानात किंचित घट झाली. मात्र, हवामान विभागाने नव्याने उन्हाच्या लाटेचा इशारा दिल्याने विदर्भातील जनतेला आणखी दोन दिवस उन्हाचा तडाखा सहन करावा लागणार, अशी चिन्हे दिसत आहेत. 

राज्यातील उष्णतेची लाट बुधवारीही कायम राहिली. विदर्भात सूर्याचा सर्वाधिक प्रकोप चंद्रपूर, नागपूर, वर्धा आणि ब्रह्मपुरी या चार जिल्ह्यांमध्ये तीव्रतेने जाणवला. कमाल तापमानात सरासरीपेक्षा दोन ते पाच अंशांची वाढ झाली. मंगळवारी विक्रमी 46.4 अंशांवर गेलेला चंद्रपूरचा पारा 46.2 वर आला. तर, गेल्या दशकातील उच्चांक नोंदविणाऱ्या नागपूरचा पारा 45.5 वरून 45.3 अंशांवर आला. विदर्भात सर्वाधिक तापमानाची नोंद चंद्रपुरातच झाली. ब्रह्मपुरी आणि वर्धा येथेही पाऱ्याने पंचेचाळिशी गाठली. 

प्रादेशिक हवामान विभागाने बुधवारी विदर्भात पुन्हा तीन दिवस उष्णलाटेचा इशारा दिला आहे. त्यामुळे पारा कमीअधिक प्रमाणात स्थिर राहण्याची शक्‍यता आहे. 

विदर्भातील तापमान 
(अंश सेल्सिअसमध्ये) 

शहर तापमान 
नागपूर 45.3 
अमरावती 42.8 
बुलडाणा 40.6 
ब्रह्मपुरी 45.2 
चंद्रपूर 46.2 
गोंदिया 44.2 
वर्धा 45.2 
वाशीम 43.0 
यवतमाळ 43.5 

Web Title: heat wave warning