पांढरकवडा येथील कृष्णा टेकडीवर भीषण आग

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 मे 2018

कृष्णा टेकडीवर लागलेल्या भीषण आगीत मौल्यवान वनसंपदा जळून खाक झाली आहे.

पांढरकवडा - कृष्णा टेकडीवर आज (गुरुवार) सकाळी ११ च्या दरम्यान भीषण आग लागल्याने आगीत वनसंपदा जळून खाक झाली आहे. मागील वर्षा पासुन या टेकडीच्या सौंदर्यीकरणावर करोडो रुपये खर्चून काम सुरु आहे. मात्र आज सकाळी ११ वाजता या परिसरात अचानक आग लागली. घटनेची माहिती होताच वनपरिक्षेत्र अधिकारी संगीता कोकणे आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाल्या. स्वतः आपल्या पथकासह त्या आग विझवण्याचा प्रयत्न करित होत्या. 

अग्निशामक दलाच्या यंत्रणेलाही यावेळी पाचारण करण्यात आले. ही आग कुणीतरी लावल्याचा संशय व्यक्त होत असुन ही आग अद्याप नियंत्रणात आलेली नाही. वनविभागाकडून यावर उपाय योजना करण्यात येत आहेत.

Web Title: Heavy fires on Krishna hill in Pandharkawada

टॅग्स