विदर्भात २४ जुलैनंतर जोरदार पाऊस?

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 जुलै 2019

पुढील दोन-तीन दिवस नागपूरसह अनेक जिल्ह्यांमध्ये दमदार पावसाच्या सरी बरसण्याची शक्‍यता आहे. २४ जुलैनंतर पावसाचा जोर वाढणार असल्याचे संकेत हवामान विभागातर्फे देण्यात आले आहेत. 

नागपूर - बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे विदर्भात सध्या पावसासाठी पोषक वातावरण असून, पुढील दोन-तीन दिवस नागपूरसह अनेक जिल्ह्यांमध्ये दमदार पावसाच्या सरी बरसण्याची शक्‍यता आहे. २४ जुलैनंतर पावसाचा जोर वाढणार असल्याचे संकेत हवामान विभागातर्फे देण्यात आले आहेत. 

जवळपास दोन आठवड्यांचा खंड पडल्यानंतर पावसाने विदर्भात पुन्हा जोर पकडला आहे. मागील तीन दिवसांमध्ये शहरात सायंकाळच्या सुमारास पावसाच्या सरी कोसळल्या. त्यामुळे पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. विदर्भात पावसाळी वातावरण आणखी दोन-तीन दिवस कायम राहणार आहे. हवामान विभागाने धो-धो पावसाचा इशारा दिला नसला तरी, मध्यम ते हलक्‍या स्वरूपाचा पाऊस पडण्याची दाट शक्‍यता आहे. लवकरच ‘सिस्टीम’ बनण्याची शक्‍यता असल्यामुळे २४ जुलैनंतर काही ठिकाणी विशेषत: नागपूर, अमरावती, अकोला, बुलडाणा व यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये दमदार पावसाची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Heavy rain after 24th of June in Vidarbha