मूर्तिजापूर तालुक्यात अतिवृष्टी

Heavy rain in Murtijapur taluka
Heavy rain in Murtijapur taluka

अकोला : तीन दिवसांपासून वऱ्हाडात पावसाने ठाण मांडलेले असून, अकोला, वाशीम जिल्ह्यात मागील 24 तासात पावसाचा जोर कायम आहे. अकोला जिल्ह्यात सरासरी 31.2 मिलीमीटर तर वाशीममध्ये सरासरी 35.37 मिलीमीटर पाऊस झाला. अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यात अतिवृष्टी झाली असून, येथे सर्वाधिक 70 मि.मी.पावसाची नोंद झाली आहे. जवळपास 20ते 25 दिवसांच्या मोठ्या खंडानंतर सावत्रिक पावसाचे पुनरागमन झाले आहे. 

मागील तीन दिवसात बुलडाण्यातील काही तालुके वगळता वऱ्हाडात सर्वदूर चांगला पाऊस झाला. मागील 24 तासात अकोला, वाशीममध्ये जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी पाऊस सुरू असून, बुधवारी (ता.11) दिवसभर पाऊस कोसळत होता. संततधार पावसामुळे शेतीतील सर्व कामे आता ठप्प झाली आहेत. सर्वत्र पाण्यामुळे पेरणीची कामे रखडली आहेत. बुलडाणा जिल्ह्यात दिवसभर ढगाळ वातावरण होते. 

पावसामुळे जलयुक्तची कामे तुडूंब

मागील तीन दिवसातील पावसाचा चांगला फायदा पिकांना जसा झाला तसाच फायदा या वर्षात झालेल्या जलयुक्तच्या कामांनाही झाला आहे. बंधारे, चर, पाण्याने तुडूंब भरू लागले आहेत. दररोज हजारो लिटर पाणी जमिनीत जिरत आहे. 

तीन जिल्ह्यातील पाऊस 
अकोलाः 34.8, बार्शीटाकळी :22.3, अकोटः 21.5, तेल्हाराः 25.5, बाळापूरः 19, पातूरः 25, मूर्तिजापूरः 70 
सरासरी : 31.2 

वाशीमः 36.94, मालेगावः 45.75, रिसोडः 49.25, मंगरुळपीरः 25.96, मानोराः 21.40, कारंजाः 33 
सरासरी : 35.04 

बुलडाणाः 28.07, चिखली : 40.08, देऊळगाव राजा : 13.08, मेहकर : 54.07, लोणारः 34.08, सिंदखेडराजा : 27.02, मलकापूर : 11.06, नांदुराः 12.08, मोताळा : 26, खामगाव : 11.07, शेगाव : 26, जळगाव जामोद : 53.06, संग्रामपूर: 31.04 
सरासरी : 28.07

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com