नागपूर जिल्ह्यात मुसळधाराची हजेरी

काटोल येनवा ब्रीज
काटोल येनवा ब्रीज

नागपूर : जिल्ह्यात रविवारी सर्वत्र पावसाने हजेरी लावली. दुष्काळग्रस्त काटोल व नरखेड तालुक्‍यात काही ठिकाणी अतिवृष्टी झाल्याची माहिती आहे. या भागात पहिल्याच पावसाचे दमदार आगमन झाल्याने शेतकरी सुखावला आहे. नागपूर जिल्ह्यातील सर्वच तालुक्‍यांत पावसाने हजेरी लावल्याने पेरणीला वेग आला आहे. पुढील तीन दिवस जिल्ह्यात सर्वत्र दमदार पावसासह अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
रविवारी रात्री नऊनंतर जिल्ह्यात सर्वत्र पावसाने हजेरी लावली. मध्यरात्री पावसाने वेग धरला. नरखेड तालुक्‍यातील सावरगाव मंडळात 120; तर भिष्णूर मंडळात 82 मिमी पावसाची नोंद करण्यात आली. नरखेड तालुक्‍यातील सहा मंडळांत 415 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. काटोल तालुक्‍यातील येनवा मंडळात 86; तर पारडसिंगा मंडळात 81 मिमी पावसाची नोंद झाली. काटोल तालुक्‍यातील सहा मंडळांत 370 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
सावरगाव व भिष्णूर मंडळांत अनेक ठिकाणी पावसाचे पाणी सोमवार दुपारपर्यंत साचून होते. रात्री सखल भागातील अनेक घरांत पाणी शिरल्याची माहिती आहे. मेंढला मंडळातील एक पूल वाहून गेल्याने शेतकऱ्यांचा मार्ग अवरुद्ध झाला. काटोल तालुक्‍यातील येनवा मंडळात गोंडीदिग्रस मार्गावरील लांडगी नदीवरील पूल वाहून गेला. यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. सोमवारी सकाळी लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या मदतीने नागरिकांनी तत्काळ पर्यायी मार्ग तयार करून वाहतूक सुरळित केली. नागपूर जिल्ह्यातील सर्वच तालुक्‍यांत पावसाने हजेरी लावल्याने खोळंबलेल्या पेरण्यांना वेग आला आहे. जिल्ह्यातील सावनेर तालुक्‍यात रविवारी पहिला पाऊस झाला. हवामान खात्याने नागपूर जिल्ह्यात दमदार पावसासह अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com